कुडाळ :
शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रसाद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र श्री गावडे यांना देण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावस्कर यांनीही नियुक्ती केली.
कामगार चळवळीतील आक्रमक व अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून जिल्ह्यात शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांसाठी पुढे येणारा आवाज अशी त्यांची ओळख असून मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष म्हणून यांनी ह्या आधी काम केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी फळी संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या भगव्या प्रवाहात जोडण्याचा मानस केला आहे. यावेळी युवासेना कणकवली विधानसभा जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, शिवसेना प्रवक्ते मंगेश गुरव, मनसेचे माजी ठेकेदार संघटना जिल्हाप्रमुख अमोल जंगले आदि उपस्थित होते