You are currently viewing मीच एकटा

मीच एकटा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मीच एकटा*

************

जगलो बेमालूम असा की

वाटले नित्यानंदात जगलो

जणु प्रेमात अखंड डुंबनी

सुख ऐश्वर्या भोगत राहिलो

 

जगती हाच भास मृगजळी

सत्य तरीही निःशब्द राहिलो

वर्षाव भाळीच्याच वेदनांचा

अलवार मी झेलीत राहिलो

 

रुजूनी, रुतले भावबंध सारे

निष्पाप भावप्रीत गुंफत गेलो

काय मिळविले काय हरविले

हिशेब आज करीतची राहिलो

 

उत्तरे आज सारीच अनुत्तरीत

मी एकटाच मज शोधु लागलो

लोचनातले , शून्यत्व निरागस

बंद पापणीत मिटवीत राहिलो

*************************

*रचना क्र. १५२

*#©️ वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा