You are currently viewing “!! वात्रट संमेलन !!”

“!! वात्रट संमेलन !!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”!! वात्रट संमेलन !!”* 

 

शाळूसोबत्यांनी योजिले वात्रट संमेलन

कुणाला ना ताळ मेळ विसरु वृद्धपण IIधृII

केस झाले पांढरे नातवंडे म्हणती साधू

दाढी शुभ्र वाटे आरसा टाकावा फोडूनII1II

कोणत्याही पॅन्ट वर कोणताही शर्ट

लोक म्हणती वय झाले करतो अल्लड पणII2II

कुटुंबात कोणा नकोत आदर्शाचे धडे

म्हणती काळ बदललाय नको दडपणII3II

नित्य कार्यक्रमांत रमून जावे आनंदात

काळाबरोबर जाणे हेच शहाणपणII4II

रस्त्याने चालताना अंतर पती-पत्नीत

दोघेही बोलतात पण ऐकणार कोण II5II

सुखदुःख अडचणी होत मानल्या तर

फिरत्या रंगमंचावरचा लुटावा आनंद II6II

म्हणतात डोळ्याला डोळा न लागणे

खोटे आहे झोप वसूल करते कर्ज ऋणII7II

म्हातारपणी विचारांची उडते धांदल

उडवती वृद्धांची खिल्ली सर्वच जणII8II

आपण सारेच आहोत लंगोटी यार

अनुभव सांगावे कोण ऐकिल आवडीनंII9II

बेतानेच करावी नित्य योगासन

खाणे पिणे बोलणे यांचे करावे संयमनII10II

 

श्री अरुण कर्जत.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा