वैभववाडी :
राज्यात महायुती व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनेची माहिती व जनजागृती अधिक गतीने व्हावी यासाठी भाजपाच्या वतीने आज सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले. वैभववाडी येथील इनामदार प्लाझाच्या भव्य पटांगणावर विविध योजनांच्या माहितीचे २० स्टॉल उभारण्यात आले आहेत. या यात्रेत जेष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनांचे स्टॉलही उभारले आहेत.
या यात्रेत पीएम किसान, लाडकी बहीण, वयोश्री, महिला सक्षमीकरण, एसटी सवलत, कृषी योजना, विज बिल माफ, घरेलू कामगार, बांधकाम कामगार योजना, तीर्थ दर्शन, आधार कार्ड अपडेट, वोटिंग कार्ड अपडेट, वरील योजनेचे कोणाचे नवीन फॉर्म भरायचे असतील किंवा काही अडचणी असतील अशा विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली जात आहे व जनजागृती करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीचे निरसन या यात्रेत केले जाणार आहे.
सोमवारी सकाळी या यात्रेचा शुभारंभ भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी श्रीफळ वाढवून केला. यावेळी माजी तालुकाध्यक्ष नासिर काझी, नगराध्यक्ष नेहा माईंनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, शारदा कांबळे, प्राची तावडे, यामिनी वळवी, विजय तावडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. तरी वैभववाडीतील लाभार्थ्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे अशी आवाहन वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.