*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”घुमट”*
घुमटाचे महत्व आहे मनुष्य जीवनांत
आरोग्य स्वास्थ्य देई सर्वांचे लाभांतIIधृII
नैसर्गिक वर्षा प्रकाश होई परावर्तित
कार्यक्षम वायू हवा करी परिसंचारण
तपमान समतोल ठेवीतो संरचनेतII1II
अधिक ऊर्जा कार्यक्षम करीतो प्रदान
हवामान नैसर्गिक आपत्तीना देई तोंड
टिकतो चक्रीवादळ प्रतिकूल परिस्थितींत II2II
ध्वनी प्रवास संगीतातील आहे आरती वाद्य
मनुष्यावस्था जन्म बाल तारुंण्य जरापणं
शरीर रचना शीर असते घुमटा प्रमाणंII3II
सर्व धर्म स्थळांवर असतात घुमट
मूर्तीवर असते छत्री प्रतीकात्मक रूपांत
पर्वत आकाशाचे रूप असे घुमटा प्रमाणंII4II
भूकंप उष्णता आग करीतो प्रतिरोध
धार्मिक विश्वासाचे प्रतीक गणिती परिमाण
घुमटा खाली बसता स्वास्थ्य भारावते मनII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.