*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निष्पाप अंतरंग*
***************
राहिले काय बोलण्याचे आता
शब्दभाव मौनात लुप्त जाहले
शमले बंध सारेच प्रीतभावनांचे
सांगण्या सारखे काही न उरले
लोचनी केवळ व्याकुळ आठव
विमनस्क अंतरातुनी पाझरलेले
निमाले गगन आशा आकांक्षांचे
लक्ष जीवनाचे आज अंधारलेले
संगती केवळ स्पंदने हुरहूरणारी
सांजाळलेले अस्ताचल रंगलेले
कां उगा आता कुणास आठवावे
निष्पाप अंतरंग हे आज गोठलेले
**************************
*रचना: १५४
*©️ वि.ग.सातपुते.(भावकवी )*