*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पक्षी विहार* 🦆🐣🪿
पाटामधलं पाणी
खळखळ छान
मैना गाते गाणी
तक धिंन तान
इवलिशी चिऊताई
खाते इवला दाणा
झोका घेते डहाळीवर
उडून जाते राना
बघून काळे ढग
मोर होतो खुश
पावसाच्या तालावर
नाचतो हुश हुश्श!
हिरव गार पोपट
बोल बोलतो गोड
देऊ कारे तुला ?
एक पेरुची फोड ?
कुहू कुहु कोकिळ ताई
कूहू कूहु गाई
लावुन पंचम सुर
रानं बहरुन जाई,
कावकाव कावळा
थोडासां बावळा
बाळाच्या भातावर
तुझा का रे ?डोळा
पक् पक बदक
पाण्यावर पोहतो
डोळा चुकून मासा
मटकन् गिळतो.
*शीला पाटील. चांदवड.*