शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन १० जानेवारी रोजी कणकवली येथे होणार

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन १० जानेवारी रोजी कणकवली येथे होणार

कणकवली

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा उदघाटन १० जानेवारी रोजी संध्याकाळी ४.०० वाजता महाडिक कंपाउंड, नरडवे नाका कणकवली येथे सन्मा. शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राउत व  पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आम. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत, सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, हिंद कामगार सेनेचे अध्यक्ष आप्पाभाई पराडकर,  अतुलजी रावराणे, बाळा भिशे, देवगड तालुकाप्रमुख विलास सालसकर व मिलिंद साटम, वैभववाड़ी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, नंदु शिंदे, सुजीत जाधव, महिला संघटक नीलम पालव , युवा सेनेचे गीतेश कडू उपस्थित रहाणार आहेत. तरी शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, युवासेना तालुका अधिकारी, महिला तालुका संघटक, शहर प्रमुख, उपशहरप्रमुख, नगरसेवक, जि.प. सदस्य, प.स. सदस्य, युवासेना व महिला विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख शैलेश भोगले आणि प्रथमेश सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा