महाॲग्री एफपीओ फेडरेशन महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी यशवंत धर्णे यांची नियुक्ती..

महाॲग्री एफपीओ फेडरेशन महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी यशवंत धर्णे यांची नियुक्ती..

दोडामार्ग

महाॲग्री एफपीओ फेडरेशन, महाराष्ट्र च्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी यशवंत धर्णे यांची नियुक्ती करण्यात आली. ते सध्या रामघाट शेतकरी उत्पादक कंपनीचे गेली तीन वर्षे संचालक व्यवस्थापन म्हणून कार्यरत आहेत. महाॲग्री एफपीओ फेडरेशन, महाराष्ट्र मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून देखील आता ते काम पाहणार आहेत. त्यांच्या कडून शेतकरी उत्पादक कंपनी व फेडरेशनचे मोफत सभासदत्व, प्रकल्प अहवाल तयार करून देणे, व्यावसाय आवश्यक परवाने काढणे, शासकीय योजना जोडणी व लाभ मिळावा यासाठी माहिती व मार्गदर्शन, कृषी मुल्य साखळी विकास करणे व त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करणे, महाॲग्री इंक्युबेशन सेटर व कृषी व्यवसाय सल्ला व सुविधा केंद्राची स्थापना करणे. या प्रमाणे सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा, माहिती, मदत व मार्गदर्शन महाॲग्री फेडरेशन मार्फत एफपीओ यांना उपलब्ध करून देऊन शाश्वत कृषी व्यवसाय विकास व शेतकरी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व सहाय्य या मार्फत केले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा