पुणे :
तितिक्षा इंटरनॅशनल आणि भारतीय विचार धारा आयोजित, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाअंतर्गत तितिक्षा शिक्षणाचार्य पुरस्कार वितरण सोहळा विविध क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवर्य शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात संपन्न झाला.
पत्रकार भवन पुणे येथे *तितिक्षा इंटरनॅशनल आणि भारतीय विचार धारा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने, शिक्षण आणी साहित्य क्षेत्रात अनमोल योगदान दिलेल्या गुरूजनांचा , साहित्यिकांचा , कलाकारांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तितिक्षा इंटरनॅशनल पुणे या संस्थेतर्फे *5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांना विविध पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.*
*तितिक्षा आंतरराष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार २०२४”, डॉ. सुधाकर जाधवर गृप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे च्या वतीने ॲड. शार्दुल जाधवर यांनी स्वीकारला.* समाजाला दिशा देणारे, प्रेरक वक्तव्य शार्दुल जाधवर यांनी केले.
तितिक्षा इंटरनॅशनल ही केवळ एक संस्था नाही तर ती एक सांस्कृतिक, सामाजिक बांधिलकी जपणारी साहित्यसंघटना आहे आणि संस्कृतीच्या स्पंदनांशी तिचा अतूट संबंध आहे. ही एक समाजातील कलात्मक व विकसनशील संस्था आहे. सुसंस्कृत समाजाचे भवितव्य घडविण्याची प्रतिक्षा आता तितिक्षा या संस्थेने संपविली आहे अशा शब्दात डॉ. न. म. जोशी यांनी आपले विचार मांडले.
डॉ.निशिकांत श्रोत्री , ॲड. शार्दुल जाधवर, मा.मंदाताई नाईक, प्रा.शरदचंद्र काकडे ,डॉ.मधुसूदन घाणेकर, भारती महाडिक आणि प्रिया प्रमोद दामले हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थितीत होते. मान्यवरांच्या हस्ते, सरस्वती पूजन,ग्रंथ पूजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील प्रा.जयंत खेडकर, सुहासिनी दिक्षित, दिपा पराडकर , मेघना जोग, वसुधा नाईक आदि मान्यवरांना शिक्षणाचार्य पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
*या समारंभात ज्येष्ठ मुद्रक, प्रकाशक, पत्रकार संपादक, भावकवी, साहित्यिक, व्याखाते, संतचित्रकार मा.वि. ग. सातपुते यांना मानाची पारंपारिक पुणेरी पगडी प्रदान करून आंतरराष्ट्रीय तितिक्षा ग्रंथराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी आपल्या जीवनात लाभलेल्या गुरुंच्या कृपाशीर्वादाने मी कसा घडलो आणि गुरूंचे महत्व या विषयावर औचित्यपूर्ण असे आपले मनोगत व्यक्त केले.
*प्रसिद्ध कवी, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत कवी *डॉ. निशिकांत श्रोत्री* यांच्या अध्यक्षतेखाली सुजित कदम, ज्योत्स्ना तानवडे, भालचंद्र चितळे, सुरेश शेठ, विलास ठाकूर या निमंत्रीत कवींचे कवी संमेलन संपन्न झाले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
समारंभाचे प्रस्ताविक, संस्थापक अध्यक्षा प्रिया दामले यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी केले.अजया मुळीक यांनी आभार प्रदर्शन केले. विजय सातपुते, दीपा राणी गोसावी, वसुधा नाईक, योगेश हरणे, अजिता मुळीक यांनी या सोहळ्याचे संयोजन केले.