जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी भीषण आग

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी भीषण आग

हजारो हेक्टर आंबा बागायत जळून खाक

रत्नागिरी 

प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रचंड आग लागली आहे. आगीत हजारो हेक्टर आंबा बागायत जळून खाक झालीय. आग लागल्यामुळे प्रकल्पग्रस्तही प्रचंड आक्रमक झाले आहेत. प्रकल्पग्रस्त भडकले असून, त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या गेट वरती मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पण ही आग नेमकी कशी लागली हे अद्यापही समजू शकलेले नाही.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, वनविभागाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग हळूहळू पसरत असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशामक दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. आजूबाजूला जंगल परिसर असल्यानं ही आग भडकत चाललीय.

प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेतील डीपीचा स्फोट झाला, त्या स्फोटानंतर ही आग भडकली. माडबन परिसरात आगीचे आगडोंब उठले असून, आंबा आणि काजू कलमे जळून खाक झाली आहेत. ग्रामस्थ आक्रमक झालेले असून, आगीनंतर ग्रामस्थांचा जमाव प्रकल्पाच्या गेटवर आलाय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा