You are currently viewing शिर्षक:- देवा गणराया

शिर्षक:- देवा गणराया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शिर्षक:- देवा गणराया*

 

 

सुख समाधान नांदावे

बाप्पांच्या पुजनाने,

निरोगी राहू दे सर्वांना

बाप्पा, तनाने व मनाने..।१।

 

अनंतातील चार दिशा

चोहिकडे तुझा वास,

श्वास घेता होत असे

मला तुझा सहवास..।२।

 

विद्येची देवता असे

तू आम्हा दे सद्बुद्धी,

नेहमी होऊ दे बाप्पा

कुविचारांची शुध्दी..।३।

 

पुजा अर्चनेत आम्ही

ठेविली कसूर नाही,

धाव घेशील ना देवा

चूक केली जर काही..।४।

 

गणराया मी पूजन

करते भक्तिभावे,

सांग कसे उतराई

तुझ्या भक्तीतून व्हावे..।५।

 

आशीर्वाद बाप्पाचा

सकलांवर राहूदे,

हेच मागणे आता

गणराया असूदे..।६।

 

 

✍🏻 *अख़्तर पठाण.*

*(नासिक रोड)*

*मो.:- 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा