*भाजपाच्या विचारला साजेस काम*
*दीडशे तरुणांना रोजगार देणारा हाच तो सावंतवाडी विधानसभेतील कार्यकर्ता…*
*सावंतवाडीत सन्मानपूर्वक प्रोत्साहनपर भजनी साहित्य संचाचे वाटप*
*पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी युवा नेते संदीप गावडे यांचे केले कौतुक*
सावंतवाडी :
सरकारी योजनेतून उपक्रम करणं सोप्पं असतं. स्वतःच्या खिशात हात घालून उपक्रम राबविण सहज शक्य नाही. भारतीय जनता पार्टीच्या विचाराला साजेस काम संदीप गावडे यांनी केले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. हिंदूत्वाची साथ भाजपने कधीही सोडली नाही. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर चालणारे आम्ही आहोत असं मत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. तर आश्वासन देण सोपं असतं, त्याची पूर्ती करण कठीण आहे. सावंतवाडी विधानसभेतला कार्यकर्ता किती परिपक्व आहे हे दिलंस तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोणत्या पद्धतीने काम करतो हे जाऊन संदीप गावडे यांच्या मतदारसंघात पाहू शकता. शंभर ते दीडशे त्या भागातील नागरिकांना रोजगाराची संधी प्राप्त करून देणारा हाच तो कार्यकर्ता आहे. याचं मला समाधान वाटतं. तसेच संदीप गावडेंनी आश्वासनांची पूर्तता केली. संदिप गावडे यांच्या मार्फत भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत साहित्य संच वाटप करण्यात आले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील या मंडळांपर्यंत पोहोचणं सोपं काम नाही याबाबत मी त्याचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो असं मत पालकमंत्री यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी व भाजप नेते संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप सूरू करण्यात आले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा संपन्न झाला. आध्यात्मिक चळवळीला बळ देण्यासाठी गावातील भजन मंडळांना स्वखर्चातून भजन साहित्य संच देण्याचा मानस संदीप गावडे यांनी केला होता. सावंतवाडी तालुक्यात २८७ परिपूर्ण अर्जापैकी १११, वेंगुर्ला तालुक्यात १३१ परिपूर्ण अर्जापैकी ४३ तर दोडामार्ग तालुक्यात ५४ परिपुर्ण अर्जापैकी २९ मंजुर करण्यात आले. या सर्व मंडळांना तबला १ नग, पखवाज १ नग, टाळ ४ नग असे भजनी साहित्याच वाटत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. बुवा भालचंद्र केळुसकर, विणा दळवी, मयुर गवळी, जान्हवी राऊळ यांचा विशेष सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर भजन साहित्य वाटप करण्यात येत आहे. भजन मंडळाशी सुसंवाद साधण्याची संधी संदीप गावडे यांनी दिली. दिडशे ते दोनशे मंडळापर्यंत संघटनात्मक पोहचण सोप्प काम नाही. सर्वांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असाच प्रयत्न गतवर्षी आम्ही केला. हजारो भजन मंडळांनी यात नोंदणी केली. मात्र, जिल्हा परिषदेचा असणाऱ्या तुटपुंज्या निधीमुळे त्याला मर्यादा आल्या. मोजक्या लोकांना लॉटरीच्या सहाय्याने ते साहित्य देण शक्य झालं. राजकारणासह समाजकारण आवश्यक आहे. खोट्या गोष्टी अनेकजण सांगतात. प्रत्यक्षात कृती करणं अवघड असते यासाठी संदीप गावडे व सहकार्यांच कौतुक करावं लागेल. सरकारी योजनेतून उपक्रम करणं सोप्पं असतं स्वतःच्या खिशात हात घालून उपक्रम राबविण सहज शक्य नाही. मनाचा मोठेपणा दाखवत हे जे साहित्याचे वाटप करण्याच काम त्यांनी केलं संदीप आणि त्याच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला साजेस काम संदीप गावडे यांनी केल. म्हणून मी त्यांचा कौतुक करतो. पंचायत समिती सदस्य म्हणून देखील त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो असं मत रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
तर, हिंदूत्वाची साथ भाजपने कधीही सोडली नाही. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर चालणारे आम्ही आहोत. आश्वासन देण सोपं असतं, त्याची पूर्ती करण कठीण आहे. गेळे, चौकुळ गाव अनेक वर्षांपासून हक्कांसाठी वंचित आहेत. त्यासाठी संदीप गावडे लढत आहेत. अशा कार्यकर्तांच्या मागे उभं रहायचं काम माझ्यासारख्याच आहे. सावंतवाडी विधानसभेत कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार प्रत्येक ग्रामपंचायतीत रूजवला आहे. कार्यकर्त्यांच्या या ताकदीवर नारायण राणेंच्या रुपाने भाजपचा खासदार कोकणात होऊ शकला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती दिली आहे. सामान्यांसाठी काम करणार हे सरकार आहे. येणाऱ्या काळात कडवट हिंदूत्वाचा विचार करायला हवा. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. महाराष्ट्राला महायुतीच्या माध्यमातून खंबीर नेतृत्व मिळो अशी प्रार्थना गणरायाचरणी मंत्री श्री. चव्हाण यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आध्यात्माचा असलेला विचार प्रकट केला. सामाजाची आपली बांधिलकी आहे. या विचारातून ग्रामीण भागातील १९० मंडळांना प्रोत्साहनपर भजन साहित्य वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, अजय गोंदावळे, पंकज पेडणेकर, रविंद्र मडगावकर, महेश धुरी, प्रमोद गावडे, आनंद नेवगी, सुहास गवंडळकर, विनोद सावंत, दादा परब, सागर ढोकरे, सत्यवान बांदेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.