३० ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव…
कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने विविध उपक्रम.
कणकवली
दरवर्षी नाभिक संत सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येते. यंदाही कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांचे निवासस्थानी व परमहंस भालचंद्र भक्त निवास येथे पुण्यतिथी व समारंभपूर्वक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
सकाळी ठिक ८ वाजता पूजन, आरती व भजन होईल. त्यानंतर तीर्थप्रसाद असणार आहे. १० वाजता समारंभपूर्वक कार्यक्रम सुरु होतील. महिलांनी काढलेल्या रांगोळी स्पर्धेतील आकर्षक रांगोळ्यांचे प्रदर्शन व परीक्षण होईल. ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या संत सेना महाराज वेशभूषा स्पर्धा होतील. संत सेना महाराज चित्र स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण देणगीदार संकेत श्रीधर नाईक व मान्यवरांच्या शुभहस्ते होईल.
अन्नपूर्णा निधी योजनेत सहभागी देणगीदारांना ‘ सन्मानपत्रे ‘ देण्यात येतील. कणकवली, खारेपाटण, तळेरे, नांदगाव, फोंडा आणि कनेडी विभागातील आदर्श नाभिक बांधवांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येईल. कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ होईल. सर्वांनी सर्व उपक्रम, स्पर्धा, समारंभपूर्वक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे असे आवाहन तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण व महिलाध्यक्षा तेजस्विनी कुबल यांनी कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने केले आहे.