You are currently viewing संवाद मीडियाच्या बातमीने उठलेला जुगाराचा फड पुन्हा बसला..

संवाद मीडियाच्या बातमीने उठलेला जुगाराचा फड पुन्हा बसला..

मालवण :

 

सुकळवाड जवळील मठाच्या बाजूला बसलेली दात पडक्या आप्पाची पार्टनरशिप मधील जुगाराची बैठक शुक्रवारी रात्री संवाद मीडियाच्या दणक्यानंतर खाकीने तात्काळ बंद पाडली होती. दात पडक्या आप्पा सुद्धा बैठक बंद पाडल्यानंतर आपल्या इनोव्हा गाडीने गोव्यातील बैठकीच्या ठिकाणी रवाना झाला होता.

एक दिवस जुगाराची सुकळवाड येथील बैठक बंद ठेवून काल रात्रीपासून ती पुन्हा सुरू करण्यात आली. आता पुन्हा बसलेल्या बैठकीला कोणीही आडकाठी करणार नाही असे सांगत बैठक सुरू झाली असून त्याला खाकीचा आशीर्वाद आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 1 =