You are currently viewing किंजवडे येथे घराची भिंत पडली ; घराचे छप्पर कधीही कोसळू शकतं

किंजवडे येथे घराची भिंत पडली ; घराचे छप्पर कधीही कोसळू शकतं

धुमडे कुटुंबियांचा १५ वर्षे पत्र व्यवहार करून ‘ग्रामपंचायत’ संघर्ष..

 

देवगड प्रतिनिधी:

देवगड तालुक्यातील किंजवडे डोबवाडी येथील अंनत धूमडे यांच्या घराची भिंत कोसळली आहे. धूमडे यांच्या घराच्या भिंतीला भेगा गेल्या असून घराचे छप्पर कधीही कोसळू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. मातीच्या भिंती आणि नळे कौलारूचं छप्पर असलेलं धुमडे यांचे घर जीर्ण झाल आहे. घरची परिस्थिती देखील बेताची असल्याने आपल्याला घर मिळावे यासाठी ग्रामपंचायत दरबारी गेली १५ वर्षे धुमडे कुटुंबीयाला संघर्ष करावा लागत आहे. ग्रामपंचायत दरबारी पत्रव्यवहार करून देखील केवळ आश्वासन मिळत असून धुमडे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घराची पाहणी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी धुमडे कुटुंबीयांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा