You are currently viewing “माझा लोकराजा” महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान

“माझा लोकराजा” महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान

कुडाळ :

सिंधुदुर्गातील कलाकारांना शासन स्तरावर योग्य तो मानसन्मान मिळण्यासाठी सिंधुदुर्ग कला अकादमीची गरज आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास राजश्री शाहू महाराज सिंधुदुर्ग वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान ज्याप्रमाणे सुधीर कलिंगड यांनी दशावताराच्या माध्यमातून लोकराजा बनण्याचा प्रयत्न केला त्याचा आदर्श नवोदित तरुण कलाकारांनी घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या माझा लोकराजा महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. कानडे बोलत होते.
यावेळी श्री मारुती मंदिर देवस्थान कमिटी अध्यक्ष मंदार शिरसाट, लाजरी क्रिकेट ग्रुप अध्यक्ष राजू पाटणकर, लोक कलावंत न्याय हक्क समिती सदस्य दिनेश गोरे, राजर्षी श्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य सौरभ पाटकर, सिंधु संप्रदाय भजन संस्था कणकवली सचिव सुदर्शन खोपे, पखवाज अलंकार महेश सावंत, सत्कार मूर्ती व जेष्ठ दशावतार कलाकार आत्माराम कोरगावकर, सदाशिव धुरी व दिलीप मेस्त्री, दशावतार नाट्य प्रेमी प्रसाद परब मोरजी गोवा, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मांजरेकर, केरवडेचे उपसरपंच अर्जुन परब, मालवण तालुका पारंपारिक दशावतार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, दशावतार कलाकार विलास तेंडोलकर, आनंद कोरगावकर व कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सिद्धेश कलीगण, लाजरी क्रिकेट ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर, दीपक भोगटे, स्वरूप सावंत, वावळेश्वर दशावतार मंडळाचे संचालक नाना प्रभू, उपक्रमशील शिक्षक बाबाजी भोई, निवेदक नीलेश गुरव, पत्रकार पद्माकर वालावलकर, काशिराम गायकवाड, राजाराम धुरी, दत्तमाऊली पारंपारिक लोककला बहुउद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा मयेकर, दशावतार संघटनेचे तालुका सचिव निळकंठ सावंत, उपाध्यक्ष ओंकार सावंत, सल्लागार मोरेश्वर सावंत, खजिनदार प्रशांत तेंडोलकर, शिवप्रसाद मेस्त्री, उदय मोर्ये, विनायक सावंत, राजू केरवडेकर, विष्णू बंगे, भरत मेस्त्री, बंड्या परब, संतोष राणे, संतोष सामंत, दिनेश मांजरेकर, दिप निर्गुण, यश जळवी, सदाशिव मोडक, निखिल निकम, संजय नाईक, संजय वालावलकर, योगेश कोंडुरकर, संजय पाटील, आशिष तवटे, अमित परब, अमोल आकेरकर, प्रतिक कलिंगण, दत्तप्रसाद शेणई, सावंतवाडी दशावतार कलाकार संघटनेची खजिनदार नारायण आसयेकर, भूमिका दशावताल मंडळाचे मालक नितीन आसयेकर, विनायक भागवत आदी उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ दशावतार कलाकार आत्माराम कोरगावकर घावनळे, दिलीप मेस्त्री मोरे व दशावतारील ज्येष्ठ हार्मोनियम सदाशिव धुरी वारीवरवडे यांचा तर दशावतारी कै. शंकर मोर्ये व कै. बाळू मुणनकर आवेरे यांच्या कुटुंबांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांच्या ही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल दशावतारातील भीष्माचार्य व ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत (काका) तेंडुलकर यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा