You are currently viewing तिराळी घाटात बोलेरो पिकअप व आयशर टेंपोत झाला अपघात…

तिराळी घाटात बोलेरो पिकअप व आयशर टेंपोत झाला अपघात…

सुदैवाने जीवितहानी नाही

दोडामार्ग
आयशर टेंम्पो चे ब्रेक फेल झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यात कोंबडी पुरवठा करून माघारी जाणाऱ्या बोलेरो पिकप वर आदळल्यामुळे भीषण अपघात झाला. हा अपघात तिराळी घाटात घडला. गेल्यावर्षी तिराळी घाट दुरुस्त केल्यामुळे यावर्षी बेळगाव दोडामार्ग या मार्गावरती वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा पाहावयास मिळते डांबरीकरण केलेले निर्धोक रस्ते असल्याने वाहनांचा वेगही जास्त असतो, परंतु हा घाट अती उतरणीचा व वळणदार असल्यामुळे अपघाताची शक्यताही असते अशातच आज दुपारी बेळगावहुन दोडामार्ग च्या दिशेने प्रवास करणारा आयशर टेम्पो (क्र. एम एच/१२/आर एन ४७९५) चे ब्रेक फेल झाल्याने त्याची धडक बोलेरो पिकप (क्र. एम एच ०९ इम ९२५४) गाडीला बसल्यामुळे अपघात झाला. या अपघातात आयशर टेम्पो चा क्लीनर किरकोळ जखमी झाला मात्र या दोन वाहनांची भीषण टक्कर झाल्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घटनास्थळी पोलिस पंचनामा करून अधिक तपास करत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + twenty =