You are currently viewing वायरी भूतनाथ मध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का ; सरपंच भाई ढोके कार्यकर्त्यांसह भाजपात

वायरी भूतनाथ मध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का ; सरपंच भाई ढोके कार्यकर्त्यांसह भाजपात

मालवण

वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्ताने भाजपा कडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी उपसरपंच संदेश तळगावकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्या नंतर आज सरपंच घन:श्याम उर्फ भाई ढोके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. माजी मालवण खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. श्री. राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. आमचा पक्ष म्हणजे एक कुटुंबं आहे, आमच्या कुटुंबात नवे जुने असा भेदभाव नाही, आजपासून तुम्ही आमच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. तुमचा पक्षात योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ गावात भाजपाने यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निमित्ताने जोरदार शिरकाव केला आहे. या ग्रामपंचायती वरील ठाकरे सेनेची सत्ता उलथाऊन टाकण्यासाठी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली कंबर कसली आहे. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या विश्वासू शिलेदारांना आपल्याकडे वळवण्यात भाजपाला यश आले आहे. आज वायरी भूतनाथचे सरपंच भाई ढोके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. गावचा विकास हिच आपली एकमेव मागणी असल्याचे भाई ढोके यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी माजी उपसरपंच संदेश तळगावकर यांनीही आपल्या अनेक सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला होता. अलीकडे वायरी भूतनाथ विभागात भाजपने घेतलेले प्रवेश विचारात घेता ठाकरे सेनेचा बुरुज यंदाच्या निवडणुकीत ढासळणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच्या प्रवेशामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटासह आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना जोरदार धक्का बसला आहे. या प्रवेशामुळे वायरी भुतनाथ गावात भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार मनोज उर्फ मुन्ना झाड यांच्या विजयाचे पारडे जड झाल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, दाजी सावजी, दीपक पाटकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, पांडुरंग मायनाक, संदेश तळगावकर, राकेश सावंत, निषय पालेकर, रवी मालवणकर, दादू डीचवलकर, नितीन तोडणकर, बाबू कदम यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवेशकर्त्यांमध्ये निखिल ढोके, अखिल ढोके, कमलेश ढोके, सर्वेश ढोके, रमेश सारंग, बाबू खोत, सुजन सागवेकर, नाना ढोके, छगन सावजी, सागर जोशी, विराज परब, यशवंत कोळंबकर, मंदार आडकर, अरुण बटे, प्रशांत तोडणकर, नितीन तोडणकर, कुंदन जोशी आदींचा समावेश आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा