You are currently viewing जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान – जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे प्रतिपादन

जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान – जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे प्रतिपादन

ओरोस:

वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेवून जिल्ह्यातील पत्रकार समाज परिवर्तनाचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज पत्रकार दिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिन सोहळा व पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम ओरोस फाटा येथील श्री इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली व जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांच्या उपस्थित संपन्न झाला.

यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, ज्येष्ठ विधितज्ञ अजित भणगे, जि.प. सदस्य अंकुश जाधव, प.स. सदस्या सुप्रिया वालावलकर, सरपंच प्रिती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, अण्णा केसरकर, माधवराव कदम, संतोष वायंगणकर, उमेश तोरसकर, संतोष सावंत, पत्रकार, गुणवंत विद्यार्थी तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकार उपस्थित होते.

तसेच यावेळी ५ वी व ८ वी मध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या १० वी, १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या मुलांचा स्कूल बॅग, सन्मानपत्र व पुष्पुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माधवराव कदम यांनी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिले आहे. याची पहिली प्रत २००० मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. तर आज दुसऱ्या आवृत्तीचे पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे (सिंधुदुर्गनगरी), ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार महादेव परांजपे (आरोंदा), कै. अरविंद शिरसाट स्मृती पुरस्कार तेजस देसाई (दोडामार्ग), उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दीपेश परब (वेंगुर्ले), उत्कृष्ट छायाचित्रकार अनिकेत उचले (कणकवली), ग्रामीण पत्रकार दिनेश साटम (देवगड) यांना मिळाले असून आज त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व पुषपगुच्छ देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संघाचा गौरव करण्यात आला.

तरेळे येथील मंडळाने पोंभूर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाची स्वच्छता केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त संदीप गावडे यांनी जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेले काम आणि घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत करतानाच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या सकारात्मक काम करण्याच्या भूमिकेमुळे वृत्तसंकलन करणे सहज शक्य होत आहे. असे सांगत जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाला पत्रकारांचे नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.

उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त दिपेश परब म्हणाले की, कै. संजय मालवणकर यांचा उल्लेख केला. त्यांचे चांगले मार्गदर्शन आपल्याला मिळाले असून त्यामुळेच आपलं इथ पर्यंत पोहोचले असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. यासह सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर म्हणाले की, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे सुसज्ज स्मारक करण्यासाठी आपले सहकार्य राहणार आहे. पत्रकारांच्या लेखणीचा जीवनावर आयुष्यावर परिणाम होत असतो शिवाय अभ्यास क्रमातही त्याचा लाभ होत असतो.

प्रिंट मिडियाचे महत्व इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुलांना पेपर वाचण्याची सवय लावावी. जेणेकरून त्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल, असे वसेकर यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. गणेश जेठे म्हणाले की, पत्रकारितेमध्ये आर्थिक थैर्य नाही. शिवाय पत्रकार हा घरी केव्हा येईल याची शाश्वती नसते. अशा परिस्थिती आपले पत्रकार चांगले काम करीत आहेत. यात पत्रकारांना सन्मान मिळावा असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच सध्याचे पालकमंत्री पत्रकारांना वेळ देवू शकत नाहीत ते सर्वसामान्य जनतेला वेळ काय देतील.

‘पत्रकार’ हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाहीचे पाहिले तीन स्तंभ चांगले काम करत आहे का? करत नसेल तर ते करून घेण्याचे काम हा चौथा स्तंभ करत असल्याचे प्रतिपादन यावेळी गणेश जेठे यांनी व्यक्त केले. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले की, पत्रकरांपासून लांब राहावे अशी मानसिकता झाली आहे. मात्र ही स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + nineteen =