You are currently viewing पुण्ण्याची शंभर टक्के हमी

पुण्ण्याची शंभर टक्के हमी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुण्ण्याची शंभर टक्के हमी*

 

केली ओंजळ रिकामी

करून किडणीचे *दान*

वचनामधून झालो मुक्त

वाचविले मातेचे *प्राण*

 

किती सोसल्या वेणा तीने

जन्मास आम्हा घालताना

पुनर्जन्म असतो मातेचा

*आईपण* पदरी घेतांना

 

नाही कळणार पुरूषांना

उभा *जन्म* गेला तरी

मारू नये *फुशारकी*

गर्भ न सांभाळता उदरी

 

रीता होतो खिसा भरलेला

वेदना त्यास कळते तेव्हा

नाही मिळत अवयव कोठे

*दारोदारी* फिरून केंव्हा

 

करा संकल्प अवयव दानाचा

नका घालू मुखी *अग्नीच्या*

*त्वचा चक्षु* येतील उपयोगी

अखेरचे क्षण मोजणा-याच्या

 

मिळेल कोणा दृष्टी *दिव्य*

येतील *नेत्रपटल* ती कामी

पहाल त्याचे “डोळ्यामधुनी”

पुण्ण्याची शंभर टक्के हमी

 

विनायक जोशी🥳 ठाणे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

प्रतिक्रिया व्यक्त करा