पोभुर्लेत बाळशास्त्री जांभेकराच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तळेरे पत्रकार संघाचे अभिवादन

पोभुर्लेत बाळशास्त्री जांभेकराच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तळेरे पत्रकार संघाचे अभिवादन

तळेरे

पत्रकारांचे आराध्य दैवत आणि पत्रकारांची पंढरी समजले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी अत्यंत साधपणाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे पत्रकार दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो.मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा हा सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्यात आला होता.मात्र प्रतिवर्षाप्रमाणे तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्रींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.तसेच पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक रवींद्र बेडकीहाळ,रत्नागिरीचे जेष्ठ पत्रकार व नारळ विकास बोर्डाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, जि.प.सदस्य प्रदिप नारकर,सरपंच सादिक डोंगरकर,सुधाकर जांभेकर,अमर आडके, सौ.बेडकीहाळ,तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड,उपाध्यक्ष उदय दुधवडकर,सचिव संजय खानविलकर,संजय शेळके, अनिल राणे,संपदा राणे,तळेरे येथील दळवी काँलेजचे मासमिडाया विभागप्रमुख प्रा.प्रशांत हटकर आदीसह ग्रामस्थांनी सहभागी होऊन बाळशास्त्रींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावर्षी अत्यंत साधपणाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.राज्यभरातील पत्रकार कोरोनाच्या सावटामुळे व जिल्हाधिकारी यांनी जाहीर कार्यक्रमाला परवानगी दिली नसल्याने या पत्रकार दिनाला राज्यभरातील पत्रकार उपस्थित राहू शकले नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा