*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अहिराणी भाषेतील हृदयस्पर्शी कथा*
*एकाकी आयुष्यानी एक अधुरी कहाणी*
*********************
नामा आप्पा शाहू नगरमा ऱ्हाये. आनी आप्पाले तठे ऱ्हानारा लोके देव माणूस समजेत .कारन नामा आप्पा कोना लेव्हाम्हा नै नी कोना देवाम्हा नै राहे. आनी कोना भांनगडमा नै .आपलं काम भलं नी आपलं घर भलं.सकाय झायी का आपलं देवन दरसन लेवान नी आपला कामवर जावान.अशा भी नामा आप्पाले कोनीज नै व्हतं .आप्पा एकूलता एक व्हता. बैन बी नै व्हती आप्पाले. आप्पाना माय बाप गयात तशा आप्पा एकलाच पडी ग्या. आप्पानं सख्ख अशें कोनीज नै व्हतं म्हनीसन आप्पा शेजारपाजारस्ले आपलं गणगोत समजीसन त्यास्ना संगे राजी खुशीमा ऱ्हाये.नामा आप्पा कपडा दुकानावर कामले व्हता म्हनीसन सकायले घरथीन बाहिर निंघना म्हंजे दिमयलेज घर येवान. आप्पानी घरनी परिस्थिती जेमतेम व्हती .त्यामुये नामा आप्पानी बाई सरू आक्का भी कोना पापड करी दे, कोना कुल्लाया करी दे ,गोधडा शियी दे.जे उन दे काम करीसन आपला सवसारनं गाडं व्हडत ऱ्हाये.सुमन आणि शरद या दोन्ही लेकरे आपला माय बापाना कष्ट दखतं ऱ्हायेत.त्या भी काहीन काही कामे करत राहेत.जलमपाईन सुमन अपंग व्हती तरी भी ती सकायले दवाखानामा कामले जाये नी संध्याकायले गल्लीम्हातला पोरेस्नी शिकोनी लिसन आपला माय बापना सवसारले हातभार लाये ,.शरद कूरीयरनं काम करिसन घरखर्च भागाडे. तशा तो हुशार व्हता चागलं शिकीसन सरकारी नौकरी करांनी हाई आमन्या लिसन शरद मन लायीसन अभ्यास करत ऱ्हाये. परिस्थीती जरी जेमतेम व्हती तरी पण घरमा बठ्ठा हाशी खूशीथीन ऱ्हायेत जेमतेम परिस्थितीना भाव कधीच कोना चेरावर दखाये नै.एक वखत खावानं पण कोना पुढे हात पसाराना नै.नी आपलं दुख कोनले सांगान नै अशी ताकीदच देल व्हती नामा आप्पानी. म्हणीसन त्या आपली गोधडी दखीनस पाय पसारेत .आपली आयपत परमानेच ऱ्हायेत.कोना हेवा दावा न करता जे ताटमा उन ते खाईसन निवाई जायेत. नी सुखनी झोप काडेत,नी सकायमा उठीसन रवत खेवत जो तो आपापला कामले लागी जायेत.म्हंजी शाहू नगरना लोकेस्ले नामा आप्पाना खटलाना हेवा वाटे.म्हणाले गये ते त्या त्यास्ना गल्ली मझार नितीवान खटलं व्हतं.एकदाव का शरदले नवकरी लागनी का मंग सुख आपला दारे पानी भरी.म्हनीसन नामाआप्पा बी आपला एकुलता एक आंडोरनी जी नै ती हाउस मऊस करे.कपडा म्हंनो ,बुट म्हंनो व्हया पुस्तके जे नै ते न सांगता बरोबर ली दे.बस शरदनी चांगलं शिकानं चांगली नवकरी करानी याज करता नामा आप्पा कयपात करे.कष्ट,मेहनत करतं ऱ्हाये.नामा आप्पांनी बाई सरला आख्खा गल्लीनी ती आक्का व्हती बठ्ठाजन तिले आक्काच म्हणेत.नामा आप्पा मातर तिने सरू म्हणे म्हणीसन सरू आक्का भी काई कसर सोडे नै बरं ती भी भल्लती ढोरना मायेक राबे.आख्ख घरभार कमाये म्हणीसन दोन घास सुखना पोटमा जायेत.पोरेस्लेभी चांगला संस्कार लायात त्यामुये त्या भी मायबाप ना धाकमाच ऱ्हायेत.सूमननीएकज कायजी व्हती, एक पाय तिना लंगडा व्हता.एकते पोरनी जात असे कायी ऱ्हायन म्हंजे ते पुढे जायीसन भलत्या आडचणी येतीस. सूमननी कायजी नामा आप्पा नी सरू आक्काले दिन पर दिन खात ऱ्हाये.आते देवना भरोसे सोडीसन तिना जिंदगीनी गाडी चाली ऱ्हायनती .
नामा आप्पाले ते बायको पोरेस्नाज आधार व्हता.त्यानं कोणी सुतकी भाऊबंदकी नव्हत.शेजार पाजारनाच त्या सगासोयरा व्हतातं त्यास्लेच तो आपलं समजे.पण कोनता दिन काय घटना घडी हायी कोनले सांगता येत नै. एक रोज काय झाय काय म्हाईत नामा आप्पा नेहमी परमाने कामावर गया आनी कसा काय कोन जाने चक्कर ईसन पडीग्य काय जान, आप्पाले पैभारेच दवाखानामा लैग्यात.त्या नंतर गन दवाखान करात बठ्ठा इलाज खुटीग्यात पन नामा आप्पा कायी हात मा उना नै.महीनामाते नामा आप्पांनी आवरी लिनं.घरना करता धरता माणूस घर सोडीसन चालना ग्या.सरूवर ते आभायच पडी उन.आज म्हणता आज घरमा अंधार पडी गय.हासता खेयता लेकरे हारकायी ग्यात.गल्लीम्हातला बठ्ठास्ले भलतंच वाईट वाटे आंडेरम्हाते भलता जीव व्हता बापना आते कोन दखी तिनं.पन दैवाले नै मान्य व्हणार म्हणीसन बलायी लिन बिचाराले.आशे चावळेत बाया,तसं तसं सरूले रडू ये.आते कसं व्है हायीज कायजी जप लागू दे नै..अंपग पोरंन लगीन कसं व्है.कशाका ऱ्हायेना बाप ते बापच ऱ्हास.बाप ऱ्हायना म्हणजे त्यांना आधार ऱ्हास.पण माणूसनी येळ सरनी म्हंजे त्याले जानस पडस.
थोडा दिवस आंगेपांगेनास्नी खावापेवानी मदत करी. पण मदत ना हात या घुडगा पावतचं ऱ्हातस त्या भी कवलगून मदत करथीन आपलं दुखनं टोपलं आपलेच धरनं पडस.आनी दुख भी कितला दिन धरशात घरमा बठीसन कोनी आयत खावाले दिन का बरं.म्हणीसन सरूनी कंब्बरले पदर खोसा आनी परत नवाईथी कामले लागनी.
नामा आप्पाले बोलता बोलता वरीस व्हैगे.दिन जावाले काही टाईम लागत नै.जो तो आपला कांम्हा मगन व्हैग्यात जरास दुख भी हालकं व्हैनं.आते बाप ग्या म्हणीसन हातवर हात धरीसन चालणार नव्हतं.पोऱ्यानं काय ऱ्हास त्याले नौकरी लागली म्हंजे तो चालना जायी पण सुमनन्न काय!ती दिसाले चांगली व्हती पन एक पायथीन लंगडी व्हती म्हनीसन सरू मनम्हान मनम्हा कुढत ऱ्हाये.देवनी मर्जी आते जे नशीबमा व्है ते दखायी जायी.
कसं शे ज्यान कोणी नै त्यांना देव ऱ्हास त्या देवले बठ्ठी कायजी ऱ्हास आपण मनथींन देवले व्हाकारा दिना की तो मदतले धायी येस.फक्त त्यानं नामस्मरण करत ऱ्हावानं.कारण नामा आप्पा ग्या तरी पण बापना पच्छात सरूनी आपला लेकरेस्ले चांगला संस्कार दिनात उतुमातू दिन नै, म्हणीसन शरदना प्रयत्नले देव धायी उना शरद ले बॅंकमा क्लर्क नी नवकरी लागली,सरूना चेरावर ते आनंद म्हाये नै सुमन ते भाऊले नवकरी लागली म्हणीसन आनंदमा नाचाले लागनी शरदनी आख्खा गल्लीमा पेढा वाटात.ज्या दिन शरदले नवकरीनी आडर उनी त्या दिन त्यांस्नी ते दिवायीच व्हती.पंधरा दिनमा शरदले मुंबई ले हाजीर व्हन व्हत. म्हणीसन सरू आनी सुमन्नी धावपय सुरू व्हैनी.मायनी ममता येडीच ऱ्हास ना सोनासारखा लेकरूना हाल व्हवाले नको म्हणीसन मायनी काही चिवडा करी दिना मुंक्टी ना ना लाडू करी दिनात दोन चार नवा डरेस आनी दिनात.ज्या रोज शरद मुंबईले जानार व्हता त्या दिन सरू आक्का नुसतीच थाकला पोऱ्या ना मायेक रडे, सुमन भी भाऊंले बिलगी बिलगीसन रडतं जाये.’काई रडू नको माय सरू आते सोनाना दिन सुरू झायात तुम्हना देवबानी चांगला दिन दखाडात आते आंडेरन लगीन चांगलं धामधूम म्हा करजो’.अशे आयाबाया म्हणेतं.खर शे नामा आप्पा ग्या तशे शरदना पुढला शिकशननी आख्खी जबाबदारी सुमन उखली -हायंती. ती तिना पगारवर शरदन शिकशन नी घरना खर्च भागाडे..आते शरद नवकरीले लागना तवय बहिंन्न चांगल लगनी करी. तिना उपकार फेडी.देखता देखता शरदले नवकरी लागाले एक वरीस व्हैनं.आनी सरूले सुमन्नी लगींनी चिंता खाये एकदाव का तिन लगीन व्हैन की काही चिंता ऱ्हावाव नै.म्हणीसन सरू याले त्याले सांगत ऱ्हाये पण लोकेस्ले कसे चांगली पोरं जोयजेच,त्याना बरोबर हुंडा भी मजबूत जोयजे.आज कालना पोरीभी नवकरी करतीस तरी भी पोरेस्ले सोनं नाणं पैसास्नी अपेक्षा ऱ्हास.सुमनले पोऱ्या दखाले येत त्यास्नी अपेक्षा मोठी ऱ्हाये.कायी परिस्थिती दखेत ते काहीस्ले बिन बापनी पोर नको व्हती.काई दखी जायेत पण कयाडेत नै.सुमन अपंग व्हती म्हनीसन सरूनी काही अपेक्षा नव्हती गरीब दुब्या भी चाली. ती शिकेल व्हती म्हनीसन ती काही रिकामी बठनार नव्हती ती मी काही ना काही कामधंदा करीसन नवराले हातभार लायीच फकत ती सुखी ऱ्हायनी मंजे झायं. पन तसे भी निव्वत येत नव्हतं.ज्या काही दूरना सगासाई व्हतात त्या फारकती वाला पोरे दखाडेत. सरू जराशी मांगे पुढे ईचार करे.ते ‘तू कोठे यवडी तालेवान शे.बै पोरं देखो ते अंपग आनी मंग कसाले मोठी अपेक्षा करांनी जस उन तसं दखीसन लगीन करीसन मोक्य व्हवान सोडी दिन आणि म्हणे चांगलं जबून दखा’.आशे टोची टोची बोलेत तशी सरू आक्कानी चिंता वाढे.आठवडा पाठवडाले घर ईसन शरद मायनी आनी बिहिन्नी समजूत काडेत ‘आते मी शे काही चिंता करानी गरज नै बठ्ठ चांगलं व्है’.शरद ज्या काही पैसा टाकी जाये त्या पैसा आंडेरना लगीन करता लायी ठेये.दखता देखता पाच वरिस अशाच निंगीग्यात.पण सुमन्ना लगनीना योग काही निंघे नै.बिचारी सुमन ज्या नै त्या देवनी पुजा करे,जी नै ती पोथी वाचे आयाबाया जे सांगे ते करे पण तिना पदरी गाठ कोना उपर्णाले बांदेल व्हती कोन जाने.शरदन भी आते घर यवनं कमी व्हैन आठवडा करता करता महिना महिना करता दोन दोन चार चार महिना शरद घर सुमनले आनी सरू आक्काले भेटाले येत नव्हता.फोनवर जेवढं बोलन व्हये तव्हडच.नंतर नंतर ते तो जिवान काही ना काही कामना बहाना बनाडीसन घर यवान टाळाले लागना.क्लर्क ना मेनेजर व्हैना तरी पण माय बहिनले सांगानी तसदी त्यानी करी नै.शरदनं घर यवानं कमी व्हैन फोनवर भी जेमतेमच बोले.या चिंताना पायऱ्हे सरूनी खाटलं धरी लिन.काही करता सुमनं लगीन व्हये नै.इबाक शरद भी लगीन करासारखा व्हायना पण तो काही बोले नै.जशी त्याले नौकरी लागली तशा तो भी धिरे धिरे पार बदलीच ग्या.लोके त्याले लगीन्न ईचारेत पण तो काही बोले नै.सरूले ते नात्रे दाखानी वज्जी हाऊस व्हती पण ती काही पुरी व्हणार नव्हती.म्हनीसन सरू आक्का जास्तच आजारी ऱ्हावाले लागनी.आते ते फोन करीसन भी शरद घर यवाले राजी नै.हा हा म्हणे पन येत नव्हता.काय करो काही समजे नै.आते त्यांना शिवाय सरूले आनी सुमनले कोनी नव्हत आधार देणार.कसामुळे शरद अशा परकाना मायेक वागाले लागना काही समजेना.शरद नौकरीले लागना आते सुखना दिन येतीन अशें सरूले आनी सुमनले वाटे पण कसान काय बठ्ठ मातीमोल व्हैन्न.बिच्चारी सरू रोज वट्टावर बठीसन शरदनी वाट दखे आनी सुमन मायनी समजूत काढे.
एक दिन भर दुपारले दारशे चारचाकी गाडी उभी ऱ्हायनी सरू आनी सुमन घरम्हाथीन दखाले लागनात.जशा काही शरद गाडीम्हाथी उतरना तशा सरूले आनंद व्हैना भाऊले दखताच सुमना डोयाम्हा आसू ईग्यात पन त्याना मागे आखो कोनी तरी बाई उतरनी दोनेजनी संगेंच घरम्हा उनात सरू आक्का शरदले बिलगीसन रडालेच लागनी.’भाऊ मना दादा अशा कशा रे तू शरद, मायनी याद भी नै येत व्हती का रे तुले तू का मरावर येता.बहीनले भी ईसरी ग्या का तू.असा कसा बदली ग्या रे बा’ सुमननी सरुनी समजूत काढी त्या नंतर शरद आणि त्यांना सोबत येयेल ती बाई संगेच सरूना पाय पडाले लागनात माय आंडेर चक्कराईग्यात.जवय आई हायी तुनी वहू शे आशे म्हणताच.सरू आक्का शरदवर खवळनी. ‘मरीजायजो भडवा या दिन करता तुले मोठा करा का बहीन्ना पहिलेच तू पयभारे लगीन करी लिन का माय बहीन्ना जराखा बी ईचार तुना मनम्हा उना नै का रे. नै येतूत तुना लगीनले निदान तू सांगता ते खरं’.दोन दिन लगून घरमा दांगडो चालना.त्याले काई इलाज नव्हता.’आते व्हैयी गये ते व्हैयी गये.तू काई कुरापती नको काढू आई.मी तुना आणि ताईना आशिर्वाद लेवाले ऊन.सुमन चांगली ऱ्हाती ते तिन लगीन धुम धामम्हा करतूत पन ती लगंडी शे कोन करी दिना संगे लगीन आनी कधळ व्है तिन लगीन.आनी मी पन कितला दिन लगून बिगर लगीनना ऱ्हाऊ.म्हणीसन मी लगीन करी लिन हायी मनाचं हाफिसम्हा काम करस तुना आशिर्वाद पायजे व्हता या करता तुले भेटाले उनूत ते तू लागनी मनसंगे झगडाले. आते मी काही परत फिरीसन यवाऊ नै.तुम्हले काय लागीन ते माले फोनवर सांगज्यात मी धाडी देसजासू.माले काही या घरना हिस्सा भी नै जोयजे’ अशें म्हणीसन शरद संतापमा निंघी घ्या.ते परत फिरीसन उनाच नै.उना तवळच ज्या रोज सरू आक्का मरनी. बिचारी सरू आक्का शेवट पावत ती रोज वट्टावर बढीसन शरदनी वाट दखे पन नैच…. शरदनी आधार ना हात कढीलिना आनी सुमनना लगीननी चिंता सरूले खाई गयी.सरू आक्कान कारनपानी व्हैनं पन जाता खेपे शरद बिचारी सुमनले सोडीसन चालना ग्या.तिले वाटे भाऊ मना माले संगे लै जाई पण नै बर.’तू काई कायजी करू नको मी येत जासू तुले भेटाले काई लागन ते सांग माले’ बस येवढं बोलीसन निंघीग्या पण सुमन आते येकलीच शे तिले मना शिवाय कोनी नै अशा जराक भी ईचार शरदले उना नै.बाप गया माय गयी एकाकी जगनारी बहिननी शरदले जराभी किव उनी नै. लै जाता बिचारीले ते एक कोपरामा पडी ऱ्हाती पन ईतला कशा हिव्वर व्हैग्या हाऊ शरद.आख्खी हायाती सुमन बिगर लगीन नी ऱ्हायनी सरते शेवट सुमनन लगीन काही व्हैन नै.सुमनले आपला भाऊ संगे शेवटल बोलान व्हतं म्हनीसन ती शरदसंगे फोनवर बोलनी ‘भाऊ आते मन काही खरं नै कवळ देव माले बलाई काई सांगता येत नै.पण तुना संगे बोलानी ईच्छा झायी म्हणीसन हाऊ शेवटला फोन करी ऱ्हायनू तुना शिवाय माले कोनी नव्हत या लंगडी बहीनले तू सांभाळसी. असं वाटे पण तू पराया व्हैग्या. माले इस्त्रीसन बायकोमा गुरफडाईग्या पण जे व्हैन ते जाऊ दे आते मना एकाकी आयुष्यानी कहानी आपुरीच ऱ्हायनी यान गहीर दुःख वाटस.जाऊदे मी जावावर हायी घर आशेचा पडी ऱ्हायी म्हनीसन मी हायी आपलं घर तुना नाववर करी देयेल शे.हायी तुनी गरीब लंगडी बहिन तुले आपलं घर भेटम्हा दिऱ्हायनू.मी जावावर या घरना ताबा तू लिसन तुले काय करानं व्हैयी ते करजो.मना आशिर्वाद कायम तुना संगेंच ऱ्हायी.आणि बस बिच्चारी सुमन भाऊनी वाट देखता देखता मरी गयी……..
खरचं दुःखथीन भरेल जिंदगी जगीसन सुमन हायी दुनिया सोडीसन शेवट चालनी गयी पण तिना एकाकी आयुष्यानी कहानी शेवट पावत आपुरीज ऱ्हायनी.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*