You are currently viewing तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालय दोन्ही गटांत अव्वल

तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालय दोन्ही गटांत अव्वल

*तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालय दोन्ही गटांत अव्वल*

*तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालयाचे दुहेरी यश*

कणकवली

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर,कनेडी,श्री.मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,कनेडी, श्री.तुकाराम शिवराम सावंत जुनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडीे आणि बालमंदिर कनेडी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच माजी गुरुवर्य पुरस्कृत तालुका स्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा पार पडल्या .या स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे विद्यालयाने प्राथमिक व माध्यमिक दोन्ही गटांतून प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेसाठी प्राथमिक गटातून धनिष्का तळेकर,मधुजा डोंगरे,ईश्वरी खटावकर,हर्षिता तडवी,सई सुतार,वैदेही सुतार, आरोही तळेकर,माध्यमिक गटातून आर्या घाडी,मयुरी तळेकर,आर्या भोगले,चैतन्या पवार,रक्षा भोगले,वेदिका भोगले, अनुष्का चव्हाण,या स्पर्धकांनी सहभाग घेतला.या गीतांना हार्मोनियम-आर्या घाडी,तबला- अजित गोसावी,पखवाज-आयुष घाडी,ढोलकी व हलगी-तक्षिल तळेकर,झांज-निधी पांचाळ,अशी संगीत साथ मिळाली.
समूहगीतातील दोन्ही देशभक्तीपर गीते प्रशालेचे सहा. शिक्षक संगीत अलंकार अजित गोसावी यांनी स्वतः रचली व संगीतबद्ध केली आहेत.अजित गोसावी हे विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहेत.
यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक अजित गोसावी यांचे मुख्य कार्य. अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, चेअरमन अरविंद महाडीक,सर्व शाळा स.सदस्य ,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी माजी/आजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा