You are currently viewing कुत्र्यांनी पाठलाग केल्यावर हरणाने मारली तलावात उडी

कुत्र्यांनी पाठलाग केल्यावर हरणाने मारली तलावात उडी

*कुत्र्यांनी पाठलाग केल्यावर हरणाने मारली तलावात उडी..*

रेस्क्यू टीम ने वाचवले हरणाचे प्राण..*

सावंतवाडी

आंबोली जकात वाडी येथे मानवी वस्तीत भटक्या कुत्र्यांनी सांबर हरणाच्या पिलाला जखमी केले होते हरणाच्या पिल्लू जीव वाचवण्यासाठी जकात वाडी येथील तलावात उडी मारली , प्रवीण राऊत यांनी रॅपिड रेस्क्यू टीम ला फोन केला रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य प्रथमेश गावडे राकेश अमृस्कर वनपाल गोरख भिंगारदिवे , वनरक्षक अनिकेत देशमुख , संकल्प जाधव, तानाजी चव्हाण, अनिकेत आवारे, बाळा गावडे ही टीम घटनास्थळी दाखल झाली प्रथमेश गावडे राकेश अमृस्कर बाळा गावडे यांनी पाण्यात उतरून हरणाला पकडले. प्रथमोपचारासाठी सदर हरिणीला आंबोली रेंज ऑफिसला येऊन गेले आणि हरणावर प्रथमोपचार करून त्या हरणाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा