You are currently viewing कणकवलीतील व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक

कणकवलीतील व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक

सोमवारपासून ३ टेबल लावणार : सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचे आवाहन

कणकवली

कणकवली शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने बाजारपेठेत ३ ठिकाणी टेबल लावली जाणार असून तेथे
आरटीपीसीआर टेस्टसाठी स्वाब घेतले जाणार आहेत. त्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.

कणकवली शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्ण वाढत आहेत. काल (ता.१०) कणकवलीत शहरात २६ तर तालुक्यात ९३ रुग्ण आढळले होते. कणकवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कणकवली न.पं. मधे ७ जून रोजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे व व्यापारी यांची नगराध्यक्ष दालनात बैठक झाली होती. या बैठकीत सर्व व्यापारांना कोरोनाची आटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याची अंमलबजावनी ही लवकरच करण्यात येईल. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपली कोरोनाची आटीपीसीआर टेस्ट करुण घ्यावी, असे आवाहन त्यावेळी करण्यात आले असता बैठकीत उपस्थित व्यापाऱ्यांनी आपण इतर व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय देवू असेही नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना सांगितले होते.

त्यानुसार आरटीपीसीआर टेस्ट संबंधित व्यापाऱ्यांनी चर्चा केली असून आज कणकवली न. पं. मधे नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष समिर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, व्यापाऱ्यांच्या वतीने कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवकर, उपाध्यक्ष राजू पारकर, शेखर गणपत्ये यांची बैठक पार पडली. त्यावेळी न.पं. कडून व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करिता ३ ठिकाणी बाजारपेठेत टेबल लावण्यात येतील तसेच परस्पर कोणाला आरटीपीसीआर टेस्ट कारायची असेल तर त्या व्यापाऱ्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात करुन घ्यावी. तसेच आरटीपीसीआर टेस्ट केल्याचे ( निगेटीव्ह ) असल्याचे पुरावा म्हणून देण्यात येणारे रिसीट सोबत ठेवावे, अन्यथा सोमवार पासून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची न.पं. कडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, किशोर राणे, महेश सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =