What’s app कडून सध्या सर्व युजर्स ना नोटिफिकेशन पाठवले जात आहे.त्या मधे काही अटी असून त्या स्वीकारल्या नाहीत तर ८ फेब्रुवारी २०२१ पासून तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाही असे म्हटले आहे.
तर नव्या वर्षात व्हॉट्स ॲप वापरायचे असल्यास युजर्सना त्यांच्या अटी स्वीकाराव्या लागतील. व्हॉट्स ॲप मधे काही बदल हे होताच असतात.
मात्र आत्ता व्हॉट्स ॲप अकाउंट सुरू ठेवायचं असेल तर नवीन पॉलिसी एक्सेप्ट करावी लागणार आहे.सध्या युजर्स करता Not now नॉट नाऊ जरी पर्याय असला तरी तो ८ फेब्रुवारी पर्यंतच असणार आहे.
त्या वेळी जर नियम मान्य केले नाहीत तर अकाउंट डिलीट ही करावं लागेल.