You are currently viewing रक्षाबंधनानिमीत्त समस्त पुरुष जातीला..

रक्षाबंधनानिमीत्त समस्त पुरुष जातीला..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*रक्षाबंधनानिमीत्त समस्त पुरुष जातीला…*

 

प्रिय पुरुष..

 

खरं म्हणजे आम्ही पाच बहिणी. आम्हाला भाऊ नाही.

पण गंमत म्हणजे आम्ही भाऊबीज असो, रक्षाबंधन असो

आम्ही पपानाच (वडील)ओवाळायचो.त्यामागे एक विचार होता. जो स्त्रीचे रक्षण करतो, तिचा मान ठेवतो, तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगतो आणि शपथपूर्वक तिची जबाबदारी स्वीकारतो तो पुरुष अशा दिवशी मी भावाच्या रुपात पाहते.

सीमेवरच्या सैनिकांनो ,तुम्हालाही राखी बांधून तुमच्या विषयी मी माझी कृतज्ञता व्यक्त करते.

तुरुंगातले पुरुष कैदी यांचीही बहिण बनून त्यांनाही मला राखी बांधावीशी वाटते. कारण कुठेतरी या आपल्या

सांस्कृतिक परंपरांची मूल्ये त्यांच्यातला माणूस जागा करेल.

आणि असे अनेक भरकटलेले,पीडीत, नात्यांपासून दुरावलेल्यांसाठीही हा प्रेमाचा धागा मला बांधावासा वाटतो.

आणि प्रिय पुरुषा,आज एका बहिणीने बांधलेला हा मौल्यवान धागा तुझ्यातल्या पुरुषत्वाचा अर्थ तुला नक्कीच

सांगेल.

रक्षाबंधनाच्या खूपखूप शुभेच्छा!!!

 

एक भगिनी

 

*राधिका भांडारकर पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा