You are currently viewing कट्टा येथे भाजपच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन…..

कट्टा येथे भाजपच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन…..

राज्यातील मंदिरे खुली करा….

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजपच्या वतीने शनिवारी राज्यव्यापी घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. मालवण तालुक्यात देखील घंटानाद आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर कट्टा बाजारपेठ येथील विठ्ठल मंदिरात शनिवारी सकाळी ११ वाजता घंटानाद आंदोलन पार पडले. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकत्र येत सोशल डिस्टनसिंग च्या नियमांचे पालन करत झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्याचे काम करण्याच्या दृष्टीने हे आंदोलन केले.

यावेळी काका नेवाळकर, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शक्तिकेंद्र प्रमुख राजन माणगांवकर, युवामोर्चा उपाध्यक्ष आशिष हडकर, माजी सरपंच सतीश वाईरकर, युवामो विभागप्रमुख शेखर मसुरकर, मामा बांदिवडेकर, अशोक बिरमोळे, युवामोर्चा चिटणीस मकरंद सावंत, सुहास कुबल, विनीत भोजने, महेश वाईरकर, बंटी लुडबे, युवामोर्चा उपतालुकाध्यक्ष मंदार मठकर, बिजेंद्र गावडे, सुमित सावंत व इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा