You are currently viewing रक्षाबंधन…

रक्षाबंधन…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रक्षाबंधन…*

 

रक्षाबंधन रक्षण करते पावित्र्याचे प्रतिक हे

प्राण पणाला लावतो बंधू इतिहासाचे साक्षी हे…

चित्तोडगडच्या कर्मावतीने हुमायूना बांधली राखी

रक्ष रक्ष रे भाऊराया हुमायून लज्जा “राखी”..

 

पुराणातील पहा दाखले विष्णू पाताळी गेले

बळीराजाला राखी बांधून लक्ष्मीने देवा नेले…

चक्र लागले श्रीकृष्णाशी शेला फाडते पांचाली

वस्त्रे पुरवी सभेत श्रीहरी वरून हसला तो गाली..

 

महती अशी ही राखीची हो भाऊ जागतो वचनाला

रेशीमबंध तो बहिणीचा हो गाठ बांधतो प्राणाला…

सोपे नाही वचन पाळणे निष्ठेशी आहे गाठ

भाऊ राखतो कडा बनूनी बहिणीची नेहमी पाठ…

 

अतीव नाजुक असती धागे रक्ताची ना जरी नाती

बहिणभाऊ उभे राहती प्राण घेऊनी ते हाती..

शिका शिका हो शिका काही ते इतिहासाची

ती पाने

बहिणभावाच्या प्रेमाची मग फुलतील पहा ती

उद्याने…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा