You are currently viewing तिलारी कालव्याला कुडासेत भगदाड, रस्त्यासह शेतात पाणी…

तिलारी कालव्याला कुडासेत भगदाड, रस्त्यासह शेतात पाणी…

तिलारी कालव्याला कुडासेत भगदाड, रस्त्यासह शेतात पाणी…

अधिकाऱ्यांकडून पाहणी; गोव्याचा पुरवठा काही दिवस बंद राहणार..

दोडामार्ग

तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या गोव्याकडे जाणाऱ्या डाव्या कालव्याला कुडासे येथे भगदाड पडले आहे. त्यामुळे परिसरातील शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर गोवा राज्याला होणारा पाणी पुरवठा काही दिवस बंद राहण्याची शक्यता कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तिलारी प्रकल्पाचा कालवा फुटण्याचे प्रकार काही केल्या थांबेनासे झाले आहेत. जसं आभाळ फाटलं तर ठिगळ कुठं लावणार असे बोलले जाते अगदी तशीच अवस्था सध्या तिलारी कालव्यांची झाली आहे. त्यामुळे ३० ते ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या या संपूर्ण कालव्यांचे नूतनीकरण करणे हीच काळाची गरज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळीच तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला कुडासे भोमवाडी येथे भले मोठे भगदाड पडले. लाखो लिटर पाणी या भगदाडाने बाहेर पडून तेथील शेतकऱ्यांच्या शेती बागयतीत घुसून नुकसान झाले. तर कुडासे रस्त्याला सुद्धा कालव्याच्या पाण्याने नदीचे स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान ही घटना समजताच तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी घटना स्थळी भेट देऊन कालव्याचे पाणी तात्काळ बंद केले. त्यानंतर कालव्याची व नुकसानीचीही पाहणी केली. या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करुन कालव्याचे काम करण्यात येणार असल्याचेही माहिती यावेळी जाधव यांनी दिली.

*संवाद मीडिया*

*खास लोकाग्रहात्सव ॲाफर १५ ॲागस्ट पर्यंत*
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
*किंग्स ऑफ़ एसयूव्ही-टाटा मोटर्स*
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

७ वर्ष ७ लाख नेक्सॅान आणि
एकुण २० लाख एसयुवी आनंदी कुटुंब प्रीत्यर्थ आयोजित
🥇🥇*सेलिब्रेशन ऑफर* 🥇🥇

१५ ॲागस्ट पर्यंत वाढवली आहे

त्वरा करा..!!
*तब्बल १.६० लाख पर्यंत चे डिस्काउण्ट*
आकर्षक ऑफर्स सहित देशाची सर्वात सुरक्षित कार घेणेची सुवर्णसंधी

✅*शेवटचे काही दिवस*

✅एक्सचेंज अन्तर्गत सर्वोत्तम इवैल्यूएशन
✅ऑन रोड फाइनेंस स्कीम्स

आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली

*7377959595*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा