संदेश पारकर यांनी घेतली युवासेनाप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची भेट

संदेश पारकर यांनी घेतली युवासेनाप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्याला “विशेष पर्यटन पॅकेज” देण्याची केली मागणी

“सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकरित्या गोव्यापेक्षाही सुंदर असुन येथील किल्ले, समुदाकिनारे, आंबोलीसारखे हिलस्टेशन, अभयारण्य, विविध धबधबे, मासे, फळे, पारंपारिक कला, लाकडी खेळणी, मालवणी संस्कृती व भाषा हि जिल्ह्याची ओळख आणि संपत्ती आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि येथील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी विशेष पॅकेज द्या,” अशी मागणी आज शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्तीतजास्त पर्यटक यावेत यासाठी समुद्र किनाऱ्यांवरील काही नियम व अटी शिथिल करण्याची मागणी देखील यावेळी श्री.आदित्य ठाकरे यांच्याकडे श्री.पारकर यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढिस चालना मिळावी यासाठी संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन पर्यटन वाढावे यासाठी तसेच जिल्ह्यातील संस्कृती जपण्यासाठी व स्थानिक युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने पर्यटनपुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी कमी पडु देणार नसल्याचे आश्वासन श्री.पारकर यांना दिले. श्री.आदित्य ठाकरे यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना संघटना वाढीच्या दृष्टीने देखील श्री.पारकर यांची यावेळी सविस्तर चर्चा झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा