क्रीडा समन्वय समिती व शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग यांची आज कुडाळात संयुक्त बैठक…..

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समिती सिंधुदुर्ग व शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग यांची संयुक्त बैठक आज सायंकाळी 5 वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.. या सभेत उद्या होणाऱ्या पालकमंत्री दौरा मधील क्रीडा विषयक शासकीय सभे बाबत चर्चा होणार असून जिल्ह्यातील सर्व एकविध खेळ संघटना तसेच क्रीडा शिक्षकांच्या अनेक अडी अडचणी व विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
तरी क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन निमंत्रक नंदन वेंगुर्लेकर, बयाजी बुरण व जयराम वायंगणकर यांनी केले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =