You are currently viewing सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर

सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर

राजेश मोंडकर, भूषण आरोसकर, मोहन जाधव, जतिन भिसे,वसंत केसरकर याना पुरस्कार जाहीर

सावंतवाडी

सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पत्रकार राजेशमोंडकर, भूषण आरोसकर, मोहन जाधव, जतिन भिसे व जेष्ठ पत्रकार समाजसेवक वसंत केसरकर यांचा यात समावेश आहे. निवड समितीत नगरसेवक ॲड. परिमल नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चितारी,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेंबकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांचा समावेश होता. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दै. सकाळचे पत्रकार भुषण आरोसकर यांना, माजी आमदार जयानंद मठकर स्मृती पुरस्कार तरुण भारतचे उपसंपादक राजेश मोंडकर यांना, कै. बाप्पा धारणकर यांच्या नावे दिला जाणारा उत्कृष्ट अष्टपैलू पुरस्कार दै. प्रहारचे छायाचित्रकार जतिन भिसे, डॉ.अजय स्वार यांच्याकडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव तर कै. हरिश्चंद्र वाडीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जेष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्य सेनानी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांच्या वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + twenty =