You are currently viewing चिपी विमानतळावरून “सिंधुदुर्ग पुणे” विमानसेवेला हिरवा कंदील…

चिपी विमानतळावरून “सिंधुदुर्ग पुणे” विमानसेवेला हिरवा कंदील…

चिपी विमानतळावरून “सिंधुदुर्ग पुणे” विमानसेवेला हिरवा कंदील…

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मालवण

चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग ते पुणे या रूट साठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करतात मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे गणेश चतुर्थी पूर्वी ही विमानसेवा फ्लाय 91 कंपनी तर्फे सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती माजी सभापती निलेश सामंत यांनी दिली. तसेच ही सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा आठवड्यातून दोन दिवस न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवावी अशी मागणी त्यांनी माजी खास.नारायण राणे यांच्याकडे केली आहे.

फ्लाय 91 कंपनी तर्फे सद्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस सिंधुदूर्ग-पुणे -सिंधुदुर्ग अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळणे साठी अडचण येत होती. याबाबत माजी केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या नंतर दोन दिवसा साठी विमान सेवा सुरु करणे चे आदेश देणेत आले आहेत. दरम्यान या बाबतची माहिती माजी सभापती निलेश सामंत यांनी मा.राणे साहेबांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आणि सदर विमान सेवा संपूर्ण आठवडा भर कायम स्वरुपी सुरु करण्या साठी प्रयत्न करण्याची मागणी केली. या बाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन राणे यांनी दिले आहेत. यावेळी आमदार श्री. नितेश राणे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा