You are currently viewing मळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

मळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. काँग्रेसचे ग्राम कमिटी अध्यक्ष पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा नाही कारण शिवसेनेचे पदाधिकारी जसे बोलतात तसे वागत नाहीत, याचा प्रत्यय आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीत आला. त्यामुळे आमचा शिवसेनेला मळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पाठिंबा नाही जे काही उमेदवार आम्ही मळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले आहेत ते स्वबळार लढणार आहेत आणि 100% निवडून येतील असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =