You are currently viewing बांदयातील ३०८ पूरग्रस्त लाभार्थी भरपाई पासून वंचित – जावेद खतीब 

बांदयातील ३०८ पूरग्रस्त लाभार्थी भरपाई पासून वंचित – जावेद खतीब 

बांदयातील ३०८ पूरग्रस्त लाभार्थी भरपाई पासून वंचित – जावेद खतीब

१२ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा न झाल्यास तहसीलवर मोर्चा…

बांदा

पूरग्रस्त नुकसान भरपाईचे पैसे महसूल विभागाकडे येऊन सुद्धा खात्यात वर्ग करण्यात न आल्याने बांद्याचे ३०८ लाभार्थी अद्याप पर्यंत भरपाई पासून वंचित आहे.
याबाबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब व गुरुनाथ सावंत यांनी महसूलचे अधिकारी समर्थन पेठे यांना आज घेराव घालत जाब विचारला, तसेच १२ ऑगस्ट पर्यंत पैसे खात्यात वर्ग न झाल्यास सर्व लाभार्थ्यांना घेऊन सावंतवाडीत तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा