You are currently viewing मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

मालवण आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

मालवण

मालवण एसटी आगाराचे आगारप्रमुख, शहरातील धुरीवाडा येथील रहिवासी सचेतन जयराम बोवलेकर (वय -५७) यांचे आज अल्पशा आजाराने पणजी येथे निधन झाले. त्यांच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने एसटी कर्मचाऱ्यांनी दुखः व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच एसटी कर्मचाऱ्यांनी पणजी गोवा येथे जात अंत्यदर्शन घेतले.

मालवण एसटी आगारातून जास्तीत जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी बोवलेकर यांचा सतत प्रयत्न होता. आगारप्रमुख असूनही ते सर्वच कर्मचाऱ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. बोवलेकर हे सच्चू या नावाने परिचित होते. एसटी निवृत्त अधिकारी राजाराम बोवलेकर यांचे ते मुलगे, एलआयसी विभागातील अधिकारी सतेजा बोवलेकर यांचे ते पती होत. त्यांच्यामागे वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा