You are currently viewing साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवामध्ये कवी संमेलन संपन्न..

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवामध्ये कवी संमेलन संपन्न..

पुणे :

पुणे शहर जिल्हा मातंग समाज आयोजित दोन दिवशीय साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, शाहिरी जलसा, विविध पुरस्कार, अभिवादन सभा आणि सुप्रसिद्ध साहित्यसम्राट पुणे संस्थेच्या कवी संमेलनचे आयोजन स्वारगेट पुणे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ करण्यात आले होते. त्यावेळी कवी संमेलनामध्ये साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नसते तर मी निर्भीड आणि परखड कवी झालोच नसतो. असे मत अध्यक्षीय भाषणातून जेष्ठ कवी गझलकार म. भा चव्हाण यांनी व्यक्त केले.

यावेळी जयंती स्वागताध्यक्ष सदाभाऊ डावरे, सचिव सनीभाऊ डाडर, डॉ.भरत वैरागे, खंडूजी पवार, समिती सदस्य भिसे, सकट , विशेष कार्यकारी अधिकारी विनोद अष्टुळ, बाळकृष्ण अमृतकर, संध्या गोळे, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, सिताराम नरके, बाबा ठाकूर, बंडा जोशी आणि म. भा. चव्हाण विचारपीठावर उपस्थित होते.

या कवी संमेलनामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ३० नामवंत कवी कवयित्री यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याप्रती भावना व्यक्त करणाऱ्या आपल्या बहारदार रचना सादर करून काव्यरसिक आणि अण्णाभाऊ विचारप्रेमींची मने जिंकली. त्यामध्ये राहुल भोसले, राजू जाधव, बाळकृष्ण अमृतकर, ॲड. संध्या गोळे, ऋचा कर्वे, ॲड. उमाकांत आदमाने, बाबा ठाकूर, दीपक नरवडे, प्रतिभा कीर्तीकिरवे, खलील शेख, बबन चव्हाण, शाहीर शिवाजीराव थिटे, विजय सातपुते, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, दिनेश गायकवाड, जगदीप वनशिव, सिताराम नरके, सुजित कदम, गणेश पुंडे, ॲड. अनिता देशमुख, प्रल्हाद शिंदे, चंद्रकांत जोगदंड, रूपाली अवचरे, मोहिनी पवार, बंडा जोशी विजय बागव, आनंद गायकवाड विनोद अष्टुळ आणि म. भा चव्हाण इत्यादी प्रसिद्ध कवी आणि कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे काव्यरचना सादर केल्या.

अण्णा भाऊंचे विचार देणारे प्रबोधनात्मक सूत्रसंचालन साहित्यसम्राट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी केले. तर जयंती उत्सव समितीचे सदस्य सकट यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा