You are currently viewing चाळणी आणि सूप

चाळणी आणि सूप

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*चाळणी आणि सूप*

 

भारत देश हा सांस्कृतिक वारसा असलेला देश!जुन्या काळातील ऋषी मुनींचा हा देश! इथली समाजव्यवस्था सर्व स्थितीचा विचार करणारी! प्रत्येक गोष्टीत काहीतरी गहन समाजाभिमुख विचार दडलेला! प्रत्येक वस्तू उपयोगी व गूढ अर्थ असलेली आता रोजच्या वापरातल्या चाळणीचेच उदाहरण पहा ना!

चाळणीचे काम चाळणे! स्वच्छ दाणेदार तेव्हडे घेऊन बारीक सारीक , कचरा ,खडवण, किडे असं सगळं नको असलेले खाली टाकून देणे!

खरंच आपल्या भारतीय जीवनात किती छान व्यवस्था करून ठेवलीय!चाळणीनंतर उपयोग करतात सुपाचा! धान्य सुपात घेऊन पाखडतात नको असलेले समोर आले की झटकून टाकायचे

चाळणी सूप ह्या दोन्ही दैनंदिन जीवनात आवश्यक समजल्या जात पूर्वी! ह्या दोन्ही वस्तू प्रतिकात्मक वस्तू! यातून काय शिकायचे?

मनाचीही अशीच चाळणी असावी या चाळणीतुन वाईट गलिच्छ अनावश्यक विचार गळून पडतील व मनात फक्त चांगले विचार राहतील

धान्य चालणारी चाळणी फक्त ऐहिक वस्तू– धान्य चाळते तर मनाची चाळणी?

या मनाच्या चाळणीचं काम खूप मोठं–

कोण खरे हितचिंतक कोण हितशत्रू?कोणाचं आपल्यावर निस्वार्थ प्रेम तर कोण हितशत्रू? कोण वरवर गोड बोलणारे तर कोण केसाने गळा कापणारे? कुठे थांबायचं कुठे पुढे जायचं, कुठे मौन कुठे दिलखुलास गोष्टी ? हे सगळं मनाच्या चाळणीत चाळता येतं!! ही मनाची चाळणी चांगली दणकट असली पाहिजे हा

नीर क्षीर विवेक अस काय तरी म्हणतात ना तो असला की आपलं जीवनही निकोप स्वच्छ होऊन जायला फारसा वेळ नाही लागत!

अशीच रोजच्या वापरातील वस्तूचानीट अभ्यास केला, विचार केला तर भौतिक उपयोगीते सह त्यावस्तुत मनुष्याने कसे राहावे कसा विचार करावा याचे रहस्य दडलेले आहे उदा केरसुणी, पाटा वरवंटा खलबत्ता — अशा अनेक वस्तू आहेत की ज्या आपल्याला शिकवण देत असतात परंतु काळ बदलला या जुन्या वस्तू कालबाह्य झाल्या

आपली राहणीही बदलली

जुने विचार नको वाटतात आपली संस्कृती नको वाटते

परंतु जुने ते सोने हे विसरून नाही चालणार!

दैनंदिन जीवनात या वस्तू वापरात नसल्या तरी लाक्षणिक अर्थाने जीवन सुखी होण्यासाठी या वस्तुंचा उपयोग आपल्याला करावाच लागणार!

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

9421828413

प्रतिक्रिया व्यक्त करा