*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री कल्पना मापुसकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*असे करू नको*
एवढे असहाय करू नकोस
की नाही म्हणणे कठीण जाईल
आपल्याच आरश्यात आपलाच चेहेरा
आपल्याला मग परका होईल
एवढे पांगळे करू नकोस
आधाराविना जगणे नसेल
आपल्याच पायावर आपल्याच शरीराचे
आपल्याला मग ओझे होईल
एवढे दूर लोटू नकोस की
जवळीकताच शत्रू होईल
आपल्याच दारात आपलेच माणूस
आपल्याला मग पोरके होईल
कल्पना दिलीप मापूसकर
मीरा रोड
90826 46494