You are currently viewing देवगड येथे चालत्या कारला आग, गाडीचे मोठे नुकसान…

देवगड येथे चालत्या कारला आग, गाडीचे मोठे नुकसान…

देवगड येथे चालत्या कारला आग, गाडीचे मोठे नुकसान…

देवगड

मुणगे-लब्देवाडी येथील महेंद्र यशवंत नाटेकर यांच्या चालत्या व्हॅगनार कारला अचानक आग लागली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना आज पहाटे ४ वा. च्या सुमारास मशवी तिठा येथे घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. नाटेकर हे आपल्या ताब्यातील व्हॅगनार कारने आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे निघाले होते. त्यांची कार मशवी तिठा ते नारिंग्रे या मार्गावर आली असता कारच्या पुढील भागातून आगीच्या ठिणग्या उडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते तात्काळ कारमधून खाली उतरले. मात्र याचदरम्यान गाडीने पेट घेतला. या घटनेत श्री. नाटेकर हे सुदैवाने बचावले. याबाबत त्यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा