You are currently viewing येत्या 27 जानेवारीला काळया फिती लावून काम; तर 28 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि बेमुदत संप..

येत्या 27 जानेवारीला काळया फिती लावून काम; तर 28 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि बेमुदत संप..

सिंधुदुर्गनगरी-

“राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या न्याय मागण्यांबाबत राज्य सरकारने गेल्या दीड वर्षात नुसते चर्चेचे आमंत्रण ही न दिल्याने खाजगीकरण, रिक्त पदे, अनुकंपा सह विविध 25 मागण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर धूळखात पडला आहे. याबाबत राज्य शासनाने दखल न घेतल्यास लवकरच बेमुदत संप पुकारावा लागेल,” असा इशारा राज्य सरचिटणीस प्रकाश बने यांनी दिलाआहें. 

राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह महसूल आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत गेल्या दीड वर्षात संघटनेशी चर्चा करण्याचे शासनाने टाळले आहे. याबाबत राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी येत्या 27 जानेवारी रोजी काळ्या फिती लावून काम, 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने तर 29 रोजी एक दिवशीय संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्गनगरी येथे आज राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची राज्य सरचिटणीस प्रकाश बने राजन राऊत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष एल. सपकाळ, श्री सावंत. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे श्रीमती वालावलकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी महसूल कर्मचारी संघटनेचे सचिन माळवे आदींसह उपस्थित होते. यावेळी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यशासन गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अन्य महसूल संघटनांच्या पदाधिकाऱ्या बरोबर चर्चा करण्याचे टाळत आहे.

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या 25 मागण्यांबाबत राज्यशासनाकडे निवेदन देऊनही याची दखल घेतली नाही. शासनाने रिक्त पदे न भरता खाजगीकरणाचे धोरण, कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तसेच जनतेमध्ये ही नाराजी आहे. वर्ग 1 ची ही अनेक रिक्त पदे असून एका अधिकाऱ्याकडे दोन-तीन चार्ज आहेत ते सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. शासनाने खासगीकरणाचे धोरण रिक्त पदे भरावी. अनूकपा रिक्त पदे भरावी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्याबरोबरच जिल्हा परिषद नगर परिषदेच्या आहेत, असे असूनही या मागण्यांचा राज्य सरकार दखल घेत नाही.

त्यामुळे आम्हाला येत्या 27 जानेवारी रोजी काळ्या फिती लावून काम करावे. तसेच 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने तर 29 रोजी संपाचा इशारा देत या मागण्यांबाबत राज्य सरकार सहानुभूती दाखवत नसल्याने राज्यभरातील साडेचार लाख कर्मचारी यांच्या या मागण्या भिजत पडल्या आहेत. राज्य शासनाने त्याची दखल घ्यावी, अशी आमची मागणी आहे .

आज जिल्हास्तरीय झालेल्या बैठकीत संघटनेने उद्याच्या 27 रोजी काळा फीत लावून 28 रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून राज्य सरकारने याबाबत दखल न घेतल्यास आम्हाला बेमुदत संपावर जावे लागेल, असाही इशारा राज्य सरचिटणीस प्रकाश बने यांनी दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + twelve =