*शिवसैनिकांच्या भावनांना मुख्यमंत्री न्याय देणार!*
तासगाव (गुरुदत्त वाकदेकर) :
तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख संजय चव्हाण यांना उमेदवारी द्या, अशी मागणी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केली.
सांगली येथे विधानसभेच्या दृष्टीने शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच सांगली येथे आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. सदर बैठकीत तासगाव व कवठेमहांकाळ विधानसभेसाठी शिवसेना तालुकाप्रमुख संजय चव्हाण यांचे नाव एकमुखी घेण्यात आले. चव्हाण हे तासगाव कवठेमंकाळमध्ये गेले अनेक वर्ष शिवसेनेत सक्रिय राहून शिवसेना घरोघरी पोहोचविण्याचे काम करित आहेत. तसेच मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम मिळावे आणि मतदारसंघ सुजलाम सुफलाम व्हावा, या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला एमआयडीसीचा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि जिल्हाप्रमुख आनंद पवार यांच्या पाठीमागे लागून मंजूर करून घेतला आहे.
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अंध, अपंग, विधवा लोकांना त्यांनी पेन्शन मिळवून दिली आहे. मतदारसंघांमध्ये दूध दराच्या तफावतीबाबतचा विषय त्यांनी ताकतीने लावून धरत थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे दुधातील तफावत दूर करून अनुदान शेतकऱ्यांना देण्याचे साकडे घातले होते. यानंतरच गाईच्या दुधाचा दर २७ वरून ३० रुपये देण्यात आला. तर पाच रुपये तफावत ही देण्यात आली. मतदारसंघातील विविध प्रश्नांसाठी व सामान्यांसाठी झटणारा शिवसैनिक, अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या कामाचा आलेख पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देतील, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यावेळी संजय चव्हाण यांनी मतदारसंघाची जबाबदारीसाठी व विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिवस रात्र एक करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कार्यान्वित असलेल्या शिव उद्योग संघटनेचे महाराष्ट्र राज्य इव्हेंट समिती प्रमुख गुरुदत्त वाकदेकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुनीता ताई मोरे, जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र (भाऊ) चंडाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेणुकाताई आंबेगिरी, युवा सेना जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.