You are currently viewing कृषी महाविद्यालय कांचनवाडी येथे शेतकरी उत्पादक कंपनी या विषयावर वेबिनार संपन्न

कृषी महाविद्यालय कांचनवाडी येथे शेतकरी उत्पादक कंपनी या विषयावर वेबिनार संपन्न

 

छत्रपति शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषी महाविद्यालयांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता.
या वेबिनार साठी कृषिभूषण ऍग्रो सर्व्हिसेसचे अध्यक्ष भूषण निकम यांची उपस्थिती होती.
वेबिनार यामागील उद्देश हा होता की आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांना उद्योजकता विकास संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तसेच विद्यार्थ्यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता जर उद्योजक झाले तर ते नोकरी देणारे होऊ शकतात यासाठी भूषण निकम यांना वेबिनार साठी आमंत्रित करण्यात आले होते.


भूषण निकम यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्याअंतर्गत फळपिकांची निर्यात त्याचबरोबर शेतकरी प्रशिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी माहितीस्तव वेगवेगळे कृषी विस्ताराचे कार्य त्यांच्याकडून घडत आहे.
वेबिनार हा आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी होता त्याच बरोबर दत्तक गावातील शेतकऱ्यांना ही बोलवण्यात आले होते वेबिनार चार वाजता सुरू होऊन साडेपाच वाजता संपला या वेबिनार चे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.के शेळके यांनी भूषविले . वेबिनार मध्ये पाहुण्यांची ओळख डॉ. सुशिल सातपुते यांनी करून दिली. निकम यांनी खालील गोष्टी वर चर्चा केली. नंबर एक विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचा फायदा करून घ्यावा , शेतकरी उत्पादक संघटना कशी स्थापन करावी, त्यासाठी लागणारे कागदपत्रे त्यासाठी लागणारे लायसन्स यासंदर्भात सविस्तर अशी माहिती दिली या वेबिनारसाठी एकूण दीडशे पार्टिसिपेंट सहभागी झाले होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रणिता मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अतुल भोंडवे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − nine =