जे. एस .डब्लु या लोह खनिज प्रकल्पाला आरवली सोन्सुरे ग्रामस्थांचा तीव्र विरोध.
वेंगुर्ले
जे.एस.डब्लू या कंपनीच्या माध्यमातून धाकोरे, आजगाव , मळेवाड , आरवली, सोन्सुरे, आसोली, सखेलेखोल या महसुली गावांमध्ये एकुण ८४० हेक्टर मध्ये मायनिंग प्रकल्प होऊ घातला आहे. या मायनिंग बाधित गावांमध्ये आरवलीतील सोन्सुरे हे महसुल गावं येत असल्याने व येथील ग्रामस्थांच्या पारंपरिक सुरंगी व्यावसाय असल्याने या प्रकल्पामुळे ग्रामस्थांवर बेरोजगारीची पाळी येणार आहे. या शिवाय भात शेती, नारळ, बागायती, सुपारी, कोकम , काजु अशी अनेक प्रकारची उत्पान्न नष्ट होणार आहेत. त्याप्रमाणे या संपुर्ण महसुली गावातली जमीन,घरे, मंदिरे या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. तसेच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. अशा कारणांमुळे आरवली सोन्सुरा गावांतील लोकांनी श्री देव कोकणेश्वर मंदिर आरवली सोन्सुरे येथे एकत्र येऊन सभा बोलावण्यात आली होती.
या सभेत सविस्तर विषय ग्रामस्थांकडे मांडला असता सर्व ग्रामस्थांकडून या होऊ घातलेल्या मानसिंग प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाला एक इंच सुद्धा जागा उपलब्ध करून देणार नाही. असे ग्रामस्थांचे ठाम मत आहे.
यावेळी तातोबा कुडव , सुधाकर राणे, सुहास सावळ, आबा टाक्कर, यदुनाथ चिपकर, विलास चिपकर , बाळा पेडणेकर, अनिल नाईक, त्रीवेणु चिपकर, आबा चिपकर, संतोष नाईक, संतोष मातोंडकर, चेतन गडेकर, गिरीश राणे, सोन्सुरे गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.