You are currently viewing शहरे सुंदर स्वच्छ ठेवायची जबाबदारी नक्की कोणाची? लोकाधिकार समितीचा सवाल

शहरे सुंदर स्वच्छ ठेवायची जबाबदारी नक्की कोणाची? लोकाधिकार समितीचा सवाल

*शहरे सुंदर स्वच्छ ठेवायची जबाबदारी नक्की कोणाची? लोकाधिकार समितीचा सवाल*

*बॅनर्समधून शहरांचे चाललेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयाची मदत घेणार – जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर व संघटक राजेश माने आक्रमक*

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारताची घोषणा देत आहेत आणि दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय बॅनरबाजीतून शहरांचे सौंदर्य नष्ट करून विद्रूपीकरण चालवले जात आहे. यातील किती बॅनर नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्या परवानगीने लावले गेले आहेत, त्यापासून नगरपालिकांना दरमहा किती उत्पन्न मिळत आहे याबाबत संबंधित नगरपालिका व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी जनतेला माहिती द्यावी. अनेक ठिकाणी नाक्या नाक्यांवर लागलेल्या बॅनर्समुळे अपघाताची शक्यताही निर्माण झालेली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले काम जनतेमध्ये करावे, जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे व प्रत्येकाचे काम समजून घेण्याइतकी समजूतदार आहे. त्यामुळे बॅनरमधून काम करण्याऐवजी त्या पैशात जनतेमध्ये जाऊन जनसेवेचे उपक्रम राबवा, जिल्ह्यातील सामान्य जनतेचे रोजीरोटीचे प्रश्न आजही गंभीर आहेत, त्या जनतेला मदत करा असे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांनी म्हटले आहे. तर शहरांच्या विद्रुपी करणाविरोधात सर्व शहरांच्या मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे समितीचे संघटक राजेश माने यांनी म्हटले असून न्यायालयाच्या यापूर्वी दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन होत असेल तर हे प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा