राष्ट्रवादीच्या 22 व्या वर्धापन दिन निमित्ताने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप

राष्ट्रवादीच्या 22 व्या वर्धापन दिन निमित्ताने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप

सावंतवाडी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोनाबाधित रुग्णांसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप केले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते हि फळ वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व व्यापार जिल्हा उपाध्यक्ष आशिष कदम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनामुळे यावर्षी साध्या पद्धतीने हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यावर्षी कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना हातभार लावत वर्धापन दिन साजरा केला जात आहे अस मत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केल. तर यावर्षी वर्धापन दिन सप्ताह साजरा केला जाणार असून कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना, तौक्ते वादळातील नुक्साग्रस्ताना मदत करून हा दिन साजरा केला जाणार आहे अस मत तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केल.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, डॉ. मुरली चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, आशिष कदम, संतोष जोईल, अशोक पवार, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, बावतीस फर्नांडिस, दर्शना बाबर-देसाई, अर्षद बेग, राजू धारपवार, मनोज वाघमोरे, आसिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा, सुरेश वडार आदी पदाधिकारी, डॉक्टर, नर्स उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा