*लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी जीवन सोमवंशी*
पिंपरी
लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी जीवन सोमवंशी यांची निवड करण्यात आली. ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रविवार, दिनांक २१ जुलै २०२४ रोजी वेदान्ताचार्य ह. भ. प. सुभाषमहाराज गेठे, निर्माण डेव्हलपर्सचे चेअरमन संदीप माहेश्वरी, मालपाणी उद्योगसमूहाचे डायरेक्टर आणि लायन्सच्या महाराष्ट्र विभागाचे माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन गिरीश मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जुलै २०२४ ते जून २०२५ या १९व्या सेवावर्षासाठी नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. त्यामध्ये जीवन सोमवंशी (अध्यक्ष), मुरलीधर साठे (सचिव), मुकुंद आवटे (कोषाध्यक्ष) यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी गिरीश मालपाणी यांनी आपल्या मनोगतातून रामायण आणि महाभारतातील दाखले देत उत्तम नेतृत्वासाठी आवश्यक असलेल्या दहा गुणांची माहिती दिली. सुभाषमहाराज गेठे यांनी उत्तम कर्म करून अर्जित केलेले धन योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी लायन्स क्लब हे उत्तम माध्यम आहे, असे विचार मांडले; तर संदीप माहेश्वरी यांनी लायन्स क्लबच्या सर्वांगीण सेवाकार्याविषयी गौरवोद्गार काढून संस्थेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. माजी अध्यक्ष डॉ. शंकर गायकवाड यांनी आपल्या सेवावर्षातील ९३ सेवा उपक्रमांविषयी चित्रफितीच्या माध्यमातून वैद्यकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांवर सुमारे वीस लाखांहून अधिक निधी खर्च केल्याचा अहवाल सादर केला. नूतन अध्यक्ष जीवन सोमवंशी यांनी आपल्या सेवावर्षात तन, मन, धन समर्पित करून क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहयोगातून सेवेचा नवा मानदंड निर्माण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन अध्यक्ष यांच्या सेवावर्षाची सुरवात खालील सेवाकार्याने पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा नरकेवाडी, शिरूर येथे विद्यार्थाना बसण्यासाठी संदीप वाळुंज यांच्या देणगीतून ₹ २५०००/-चे बेंच भेट दिले. ऊसतोड कामगाराच्या मुलाला लॉ कॉलेज शिक्षणाचा एक वर्षाचा संपूर्ण खर्च डॉ. रोहिदास आणि डॉ. माधुरी आल्हाट यांच्या देणगीतून ₹ ६००००/- देऊन केला. त्याचप्रमाणे घरकामगार असलेल्या महिलेच्या दहावीला ९६% गुण मिळवलेल्या मुलीला पुढील दोन वर्षे संपूर्ण शिक्षणासाठी लागणारी सर्व रक्कम जीवन सोमवंशी यांनी देण्याचे वचन देऊन सुरवातीचे ₹ ३००००/- अदा केले; तसेच आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी प्रतिवर्षी क्लब सदस्यांच्या वर्गणीतून रोख ₹ १५०००/- ची मदत केली.
शीतल सोमवंशी, जयश्री साठे, सायली संत, तृप्ती शर्मा, डॉ. दीपाली कुलकर्णी, डॉ. माधुरी आल्हाट, किरण आवटे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले आणि मुकुंद आवटे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप वाळुंज यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
——————————————–
*संवाद मीडिया* जाहिरात
*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀*
_सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_
_डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._
https://sanwadmedia.com/142095/
*📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌*
कॉलेज कोड – 11164
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि
डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..
उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत कृषी क्षेत्रात उज्वल भविष्य घडवा…
*[B. Sc. (Agri) कृषी पदवी*
*Qualification – 12th Science pass (PCB/PCBM) MHT-CET/ JEE/NEET]*
*(B. Sc. Agri (Hon) कृषी पदवी)*
*📚अभ्यासक्रम कालावधी- 4 वर्ष (8 सत्र)*📚
♦️ *पात्रता- 12 वी (विज्ञान शाखा उत्तीर्ण)*♦️
*(भौतिकशास्त्र, रासायनशास्त्र, जिवशास्त्र/ गणित)*
*प्रवेश प्रक्रिया – ऑनलाईन*
*(महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध)*
*प्रवेश क्षमता – 90 विद्यार्थी*
*🌴महाविद्यालयाची वैशिष्ठये🌴*
🌳सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त पदवी महाविद्यालय.(22 वर्ष)
🌳 मुंबई गोवा हायवे पासून फक्त 1 कि.मी.च्या अंतरावर व सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून 2 कि.मी. च्या अंतरावर
🌳 मागील 4 वर्षात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची रँकिंग – IBPS, MBA, M.Sc. व स्पर्धा परीक्षेतून विविध पदावर निवड
🌳 नैसर्गिकशेती प्रशिक्षण केंद्र समृद्ध व आनंदी गाव योजनेचे केंद्र.
🌳 उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
🌳 संगणक इंटरनेट, वाय-फाय सुविधा असणारे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग.
🌳 कॅम्पस इंटरव्यू द्वारे रोजगाराच्या / नोकरीच्या संधी उपलब्ध.
🌳 मागास विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीचा लाभ.
🌳 आर्थिक मागास व इतर मागास विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती.
🌳 एकमेव कृषी महाविद्यालय जेथे NCC / NSS उपलब्ध.
🌳 कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील विषय शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण.
🌳 खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती प्रकल्प अंतर्गत फळ प्रक्रिया उद्योगाद्वारे विद्यार्थ्यांना मोफत
*📲_*अधिक माहिती साठी संपर्क*_
🔴 Principal – (CSCAKO)
Prof. Yogesh Pednekar
*📲 9420360912 | 9373724192*
🔴 Asso. Professor
Mahesh L. Parulekar
*📲 9422373717*
🔴 Sr. Clerk
Dhondu Colwankar
*📲 9421266607*
🔴 Accountant
Santosh P. Sawant
*📲 9322707214*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*