ठेकेदाराच्या कामगारांनी काढला पळ; गुन्हा दाखल करण्याची मागणी…!
कणकवली
महामार्ग चौपदरीकरण ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आज पुन्हा एक अपघात घडला. यात महामार्गावर पत्रे कोसळून एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी एकत्र येऊन मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे.
कणकवली शहरात उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलाखाली महामार्ग ठेकेदाराने पत्रे लावले आहेत. तब्बल सहा फूट उंचीचे २ पत्रे आज कणकवली ते जाणवले जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा वर पडले. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. जखमी नंदादीप सावंत ( रा. जाणवली ) असे त्याचे नाव आहे. तर महामार्गावर यापूर्वी देखील चालत्या दुचाकीवर पत्रा कोसळून एक युवक जखमी झाला होता. तसेच उड्डाणपुलाचा स्लॅप देखील कोसळला होता.
⁰
त्यानंतर देखील महामार्ग चौपदरीकरण ठेकेदाराने सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले असून ही बाब पादचाऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. घडल्या प्रकारानंतर ठेकेदाराच्या कामगारांनी पळ काढला.दरम्यान कणकवली पोलिस निरीक्षक संजय धुमाळ व नगराध्यक्ष समीर नलावडे व कन्हैया पारकर यांच्या मध्यस्तिनंतर महामार्ग सुरळीत करण्यात आली. तसेच गुन्हा दाखल करण्याची कारवाई कणकवली पोलीस स्थानकात सुरू होती.